कानपूरमध्ये सुरू झालेल्या ‘आय लव्ह मुहम्मद’ वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये तीव्र निदर्शने झाल्यानंतर, जवळपास आठवड्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी झुबेर अहमद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. झुबेर खान हा बडतर्फ हवालदार असून, तो अलिकडेच समाजवादी पक्षात (एसपी) सामील झाला होता. त्यामुळे या वादाला आता एक नविन राजकीय वळण मिळाले आहे.
पोलिसांनी रविवारी झुबेरला अटक केली. तपासात समोर आले आहे की, शुक्रवारी नमाजानंतर धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने झुबेरने एक उत्तेजक ऑडिओ क्लिप मोठ्या आवाजात प्रसारित केली होती. या क्लिपमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, झुबेर खानचे समाजवादी पक्षाचे कानपूर जिल्हाध्यक्ष फजल मेहमूद यांच्यासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे झुबेरच्या राजकीय संलग्नतेबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या असून, वादाला आणखी राजकीय रंग चढू लागला आहे.
४ सप्टेंबर रोजी रावतपूरमधील बरवफत (ईद-ए-मिलाद-उन-नबी) मिरवणुकीदरम्यान कानपूरमध्ये सुरू असलेल्या “आय लव्ह मुहम्मद” वादाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. “आय लव्ह मुहम्मद” असे घोषवाक्य असलेले बॅनर मार्गावर लावण्यात आले होते, ज्यामुळे हिंदू गटांनी आक्षेप घेतला आणि आरोप केला की “नवीन परंपरा” सुरू केली जात आहे.
हे ही वाचा :
गृहपाठ न केल्यामुळे शाळकरी मुलाला उलटे लटकून मारहाण!
सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला
आशिया कप ट्रॉफी, भारतीय खेळाडूंची पदके हरलेल्या पाकने चोरली!
आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण
धार्मिक मिरवणुकीत नवीन प्रथा जोडण्यास मनाई करणाऱ्या सरकारी नियमांचा हवाला देत पोलिसांनी हस्तक्षेप केला. या घोषणेविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी, नंतर पारंपारिक तंबू काढून वेगळ्या ठिकाणी बॅनर लावल्याबद्दल २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप करत पोलिसांनी ही कारवाई केली.







