26 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरक्राईमनामापहलगाममध्ये दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या काश्मीरी तरुणाला अटक!

पहलगाममध्ये दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या काश्मीरी तरुणाला अटक!

पथकाकडून अधिक तपास सुरु

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी, सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी पाकिस्तान समर्थित द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या काश्मीरमधील एका व्यक्तीला अटक केली. दहशतवाद्यांना रसद पुरवल्याबद्दल पोलिसांनी कुलगाम येथील २६ वर्षीय रहिवासी मोहम्मद युसूफ कटारिया याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांच्या विश्लेषणानंतर कटारियाची अटक करण्यात आली आहे, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. सूत्रांनी सांगितले की, कंत्राटी नोकरीत काम करणारा आणि स्थानिक मुलांना शिकवणारा कटारिया काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्याने त्यांच्या हालचालींना मदत करण्यास सुरुवात केली.

तपासात असे दिसून आले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी त्याने दहशतवादी गटाला कुलगामच्या जंगलातून प्रवास करण्यास मदत केली होती. दरम्यान, पहलगाम हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. तपास अधिकारी सध्या या हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांच्या घुसखोरीनंतरच्या हालचाली, त्यांची लपण्याची ठिकाणं, तसेच त्यांना मिळालेली स्थानिक मदत याचा मागोवा घेत आहेत.

विशेषत: ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) — म्हणजेच दहशतवाद्यांना रसद, निवारा, माहिती व मार्गदर्शन देणाऱ्या स्थानिक संपर्कांकडून मिळालेली मदत — यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. या नेटवर्कच्या साहाय्यानेच हल्लेखोर काही काळ सुरक्षादलांच्या रडारपासून दूर राहू शकले, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

तपासात आतापर्यंत काही संशयित OGWs ओळखले गेले असून, तांत्रिक पुरावे आणि फोन कॉल तपशीलांच्या आधारे त्यांची चौकशी सुरू आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर कुठे लपले होते, त्यांना कोणी अन्न व निवारा पुरवला, याची सखोल चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा : 

शबरीन बनली ‘सीता’, हिंदू तरुणाशी लग्न करत म्हणाली-‘मला हिंदू धर्म खूप आवडतो’

मोहेंजोदारोच्या ‘डान्सिंग गर्ल’ची प्रतिकृती राष्ट्रीय संग्रहालयातून चोरीला; प्राध्यापकावर गुन्हा दाखल

कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!

‘वैभव’शाली फलंदाजी, १० सामन्यांत ४१ षटकारांचा विक्रमी पाऊस

जूनमध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) घोषणा केली की त्यांनी हल्लेखोरांना आश्रय आणि लॉजिस्टिकल मदत पुरवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे असून त्यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची नावेही उघड केली होती. 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा