33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामास्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!

केरळच्या महिलेला ४० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

Google News Follow

Related

पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर आपल्या लिव्ह इन पार्टनरला बलात्कार करण्यास मदत करणाऱ्या तिरुवनंतपूरममधील ४१ वर्षीय क्रूर मातेला ४० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिलेच्या प्रियकराने नंतर आत्महत्या केली होती.

तिरुवनंतपूरम येथील जलदगती न्यायालायने या प्रकरणाची सुनावणी करताना, या क्रूर मातेने मातृत्वाला काळीमा फासला असल्याचे स्पष्ट करत तिच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा देणेच योग्य असल्याचे मत नोंदवले. या महिलेला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तो दंड भरल्यास तिने असमर्थता दर्शवल्यास तिला आणखी सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील पोक्सो कायद्यांतर्गत आईवर कारवाई होणे ही दुर्मिळ घटना आहे.
ही घटना मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत घडली. ही महिला तिच्या मानसिक आरोग्याने त्रस्त असलेल्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यानंतर ती तिचा मित्र शिशूपालन याच्यासोबत राहात असे. हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या महिलेची तेव्हा सात वर्षांची असणारी मुलगीही तेव्हा या दोघांसोबत राहात असे.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या मानसिक आरोग्यावर स्वदेशी ‘रोबो’ लक्ष ठेवणार

शिशुपालन याने या मुलीवर बलात्कार केल्यामुळे तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या होत्या. तसेच, सन २०१८ ते २०१९ या कालावधीत या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. या मुलीची ११ वर्षांची सावत्रबहीणही या आरोपीच्या अत्याचाराची बळी ठरली होती. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिल्याने त्यांनी घाबरून कोणालाही याबाबत सांगितले नव्हते. अखेर त्या त्यांच्या आजीकडे पळून गेल्यानंतर त्यांनी घडला प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांच्या आजीने या मुलांना बाल आश्रमात पाठवले तिथे त्यांनी त्यांच्यावर घडलेला प्रसंग कथन केला. या महिलेच्या दुसऱ्या प्रियकरानेही एका मुलीवर अत्याचार केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू आहे.या महिलेचा प्रियकर शिशुपालन याने नंतर आत्महत्या केली. त्यामुळे केवळ आईलाच या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. या खटल्यादरम्यान एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले आणि ३२ कागदपत्रे सादर करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा