28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाबांगलादेशी नागरिकांच्या बेकायदा घुसखोरीला मदत

बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदा घुसखोरीला मदत

मुख्य सूत्रधारासह पाच जण पोलिसांच्या जाळ्यात

Google News Follow

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारतात आणून त्यांच्या वास्तव्याची आणि रोजगाराची सोय करणाऱ्या एका रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी इक्बाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनील दत्ता (वय ३५) या मुख्य संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यासह ५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील चौघांना यापूर्वीही भारतातून हद्दपार करण्यात आले होते.

खार पोलीस ठाण्याच्या दहशतवादविरोधी कक्षाचे (एटीसी) सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर खंडवी आणि त्यांचे पथक २९ सप्टेंबर रोजी दुपारी एस. व्ही. रोडवरील वांद्रे वाहतूक चौकीजवळ गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना तीन पुरुष आणि तीन महिला संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्या. यातील काही चेहऱ्यांवरून पोलीस उपनिरीक्षक अतुल मुरदारे यांना संशय आला. यापूर्वी केलेल्या कारवाईत हे चेहरे समोर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक पडताळणी केली असता, त्यातील चौघांना याआधी बेकायदा घुसखोरीप्रकरणी बांगलादेशात डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने या सहाही जणांना ताब्यात घेऊन एटीसी कार्यालयात आणले.
हे ही वाचा:
पूर्णेकर हत्याकांडाचे धागेदोरे मीरा रोडपर्यंत

दिवेआगरच्या समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बोरीवली-राम मंदिरदरम्यान ४ ऑक्टोबरला चार तासांचा जम्बो ब्लॉक

इस्रायल स्मित माछर यांना विशेष पुरस्काराने गौरवणार
चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्यांची नावे इक्बाल शेख ऊर्फ गौतम दत्ता (३५), राणा मोल्ला ऊर्फ राणा शाह (२०), समीम सरदार ऊर्फ राजू नरेंद्र (२५), हलिमा अख्तर ऊर्फ मोनिका दत्ता (२६), मोसामोद खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता (२३) आणि मफुजा अख्तर लिमा (२५) अशी असल्याचे समोर आले. हे सर्व जण मीरा-भाईंदर परिसरात वास्तव्य करत होते. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल आणि बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे जप्त केली आहेत.
एजंटचे जाळे आणि रोजगार पुरवठा
तपासात उघड झाले की, मुख्य सूत्रधार इक्बाल हा स्वतः बांगलादेशी नागरिक असून गेल्या पाच वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करत आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर होता. हलिमा सहा महिन्यांपूर्वी इक्बालच्या मदतीने भारतात आली होती, तर उर्वरित चौघे २० सप्टेंबर रोजीच सीमा ओलांडून भारतात आले होते. भारतात आणण्यासाठी इक्बालच्या सीमाभागातील साथीदारांनी त्यांच्याकडून पैसे उकळले होते. मुंबईत आल्यानंतर इक्बालने त्यांना एका स्थानिक एजंटमार्फत खोल्या मिळवून दिल्या आणि उदरनिर्वाहासाठी नोकऱ्याही शोधून दिल्या.
खार पोलिसांनी इक्बालविरुद्ध ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’ च्या कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर उर्वरित पाचही बांगलादेशी नागरिकांना पुन्हा मायदेशी हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तोपर्यंत त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी अर्ज करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा