30.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरदेश दुनियाइस्रायल स्मित माछर यांना विशेष पुरस्काराने गौरवणार

इस्रायल स्मित माछर यांना विशेष पुरस्काराने गौरवणार

चार इस्रायली प्रवाशांनाही ‘प्रेसिडेंट मेडल’

Google News Follow

Related

फ्लायदुबईच्या प्रवासी विमानात झालेल्या चाकू हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित माछर यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव इस्रायलकडून केला जाणार आहे. सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांना इस्रायल सरकारकडून सन्मानित करण्यात येणार आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रियुवेन अजार यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सामान्य नागरिकांपासून ते लष्करापर्यंत सर्वजण सध्या भारतीय कॅप्टनच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. अडचणीच्या काळात मदतीला धावून येणाऱ्या मित्रांना इस्रायल कधीही विसरत नाही, असे सांगत कॅप्टन स्मित यांना अधिकृतपणे सन्मानित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील इस्रायलचे राजदूत रियुवेन अजार यांनी या घटनेचे गांभीर्य स्पष्ट करताना सांगितले की, कॅप्टन स्मित यांच्या प्रसंगावधानामुळे सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचले. विमानावरील नियंत्रण सुटण्याचा आणि अपहरण होण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांना हवेत झेपावण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वतः तातडीच्या सुरक्षा वॉर-रूम बैठकीतून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, भारतीय वैमानिकाच्या धाडसामुळे विमान सुरक्षित राहिले आणि मोठा धोका टळला.

कॉकपिटमध्ये रक्तरंजित गोंधळ सुरू असताना पुढे जात हल्लेखोर सहवैमानिकाला जमिनीवर पाडणाऱ्या त्या चार इस्रायली प्रवाशांच्या धाडसाचीही इस्रायल सरकारने दखल घेतली आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी या चारही प्रवाशांशी फोनवर थेट संवाद साधून त्यांचे आभार मानले. राष्ट्राध्यक्षांनी या चौघांना इस्रायलचा प्रतिष्ठित ‘प्रेसिडेंट मेडल फॉर सिव्हिलियन हिरोइझम’ देण्याची शिफारस केली आहे.

हे ही वाचा:

कॅप्टन स्मित माछर यांना ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’

तृणमूलच्या चार बँक खात्यांवरील फ्रीज कायम

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

भारत-फ्रान्स सागरी सराव ‘वरुण’ला सुरुवात

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानात एका ओमानी सहवैमानिकाने अचानक मुख्य वैमानिकावर हल्ला केला. विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. विमान वेगाने खाली येत असताना जखमी कॅप्टनने कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर चार प्रवाशांनी क्रू सदस्यांच्या मदतीने हल्लेखोराला पकडले आणि विमानावरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यात मदत केली. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा