30.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरराजकारणदिपकेंनी केली महात्मा गांधीशी स्वत:ची तुलना

दिपकेंनी केली महात्मा गांधीशी स्वत:ची तुलना

कॉकरोच पार्टीचे आंदोलन

Google News Follow

Related

‘ब्रिटिशांनी महात्मा गांधी यांनाही आंदोलनासाठी अनेकदा परवानगी नाकारली होती. आज हे सरकारही आम्हाला आंदोलनाची परवानगी नाकारत आहे,’ असे म्हणत कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या आंदोलनाची तुलना महात्मा गांधींच्या आंदोलनाशी केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर दीपके यांनी सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. परवानगी नाकारली तरी २ ऑक्टोबरचे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सीजेपीकडून हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर आयोजित करण्यात आले आहे.

दीपके यांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत नागरिकांच्या आंदोलनाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकशाहीमध्ये सरकारच्या निर्णयांविरोधात शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्याचा अधिकार नागरिकांना असला पाहिजे. मुंबई पोलिसांनी मात्र शिवाजी पार्क येथे सार्वजनिक सभा घेण्याबाबत न्यायालयीन आदेश आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ दिला आहे. तसेच मैदानाच्या वापरासाठी आवश्यक परवानगी, वाहतूक कोंडी, रुग्णालयांकडे जाणाऱ्या आपत्कालीन मार्गांवर होणारा परिणाम आणि शिवाजी पार्कचा शांतता क्षेत्र म्हणून असलेला दर्जा यांसारख्या कारणांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या दोन विशेष उपनगरीय सेवा

तृणमूलच्या चार बँक खात्यांवरील फ्रीज कायम

शेअर बाजारात मोठी घसरण

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतरही २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आंदोलन करण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे. या आंदोलनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबतही सीजेपीने आक्षेप नोंदवले आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरातून नागरिकांनी मुंबईत सहभागी व्हावे आणि लोकशाही वाचवण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन दीपके यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा