वादग्रस्त माजी आएएस ट्रेनी पूजा खेडकर एका नव्या प्रकरणामुळे नुकतीच चर्चेत आली होती. एका ट्रकचालकाचे अपहरण करून त्याला खेडकरच्या घरी डांबण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी खेडकर कुटुंबियांचा ड्रायव्हर प्रदीप साळुंखे याला अटक केली आहे. यामुळे खेडकर कुटुंबिंयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रदीप साळुंखे असे अटक केलेल्या ड्रायव्हरचे नाव आहे.
नवी मुंबईमध्ये वाहनाचा अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या वादातून दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक अन् ड्रायव्हर प्रदीप साळुंखे यांनी मिक्सर चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पुण्यातील त्यांच्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. नवी मुंबई पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी चार पथके स्थापन करून, ड्रायव्हर साळुंखे याला धुळ्यातील सिंदखेडा येथून अटक केली.
#WATCH | Maharashtra: Driver of ex-IAS trainee officer Puja Khedkar's family, Pradeep Salunkhe, arrested from Dhule in connection with allegations of kidnapping a truck driver following a road rage incident in Navi Mumbai. pic.twitter.com/68DZBCYbiV
— ANI (@ANI) September 20, 2025
हे ही वाचा :
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक
एच-१ बी व्हिसासाठी मोजावे लागणार १ लाख डॉलर्स! ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?
ऑपरेशन सिंदूरनंतर पीओके वाटतोय असुरक्षित! पाकच्या ‘या’ भागात उभारतायत दहशतवादी तळ
उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती
प्रकरण काय?
नवी मुंबईतील सिग्नलवर एका मिक्सरचा कारला धक्का लागला. प्रल्हाद कुमार हा या ट्रकमध्ये होता. कारला ट्रकचा धक्का लागल्यानंतर दोन लोक कारमधून उतरले आणि त्यांनी बळजबरी प्रल्हाद याला खाली उतरवले. त्यानंतर त्यांनी त्याला कारमध्ये बसवले आणि निघून गेले. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कारचा ठिकाणा शोधला. तेव्हा ही कार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील घराबाहेर दिसली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा प्रल्हाद याला घरात डांबून ठेवलेले असल्याचे आढळून आले. पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
तक्रारदार विलास ढेंगरे (५३), जे सिमेंट मिक्सरचे मालक आहेत, त्यांनी सांगितले की त्यांचे चालक चांदकुमार चव्हाण यांनी त्यांना सांगितले होते की एसयूव्हीला मुलुंड ऐरोली पुलावरील सिग्नलवर धक्का लागला होता. वाद झाल्यानंतर, एसयूव्ही चालकाने ट्रकच्या क्लीनर प्रल्हाद कुमार (२२) ला रबाळे पोलिस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. मात्र, पुढे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास चव्हाण यांनी ढेंगरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की प्रल्हाद त्यांचे फोन उचलत नाहीत. त्यानंतर चव्हाण आणि ढेंगरे सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे भेटले आणि त्यांनी प्रल्हादचा शोध सुरू केला. मात्र, यश न आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.







