30.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामाकामावर उशीरा आल्याने अल्पवयीन मोलकरणीला विवस्त्र करून मारहाण

कामावर उशीरा आल्याने अल्पवयीन मोलकरणीला विवस्त्र करून मारहाण

Google News Follow

कामावर यायला उशिर झाल्यामुळे अल्पवयीन मोलकरणीला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची अमानुष घटना अंधेरीच्या वर्सोवा परिसरात घडली आहे. मारहाणीत अल्पवयीन मोलकरीण गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलिसांत मालकिणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मोलकरीण ही १७ वर्षाची असून, ती अंधेरीच्या पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात घरकाम करते.

पीडित मुलगी ६ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे घरकामासाठी गेली. पण त्या दिवशी तिला कामाला जायला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे घरमालकीण संतापली. पीडित मुलगी कामासाठी घरी येताच, संतापलेल्या मालकिणीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकिणीने यापूर्वीही तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तिला विवस्त्र केले. तेवढ्यावरच तिचा अमानुषपणा थांबला नाही. तर पीडितेचा मोबाईलमध्ये न्यूड व्हिडिओ काढला. तसेच न्यूड फोटोही काढले. त्यानंतर तिला चप्पलेने बेदम मारहाण केली.

हे ही वाचा:

रुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू! ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ

मुंबईत आता दिसणार लाल-पांढरे झेब्रा क्रॉसिंग

‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’

महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया

मारहाणीमुळे पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाणे गाठून मालकिणीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यान्वये मारहाण, विनयभंग, अपमान आणि बाल संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा