31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरक्राईमनामाकेरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

एनआयएने केली अटक

Google News Follow

Related

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इस्लामची कथित थट्टा केल्याने सन २०१०मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या आता बंदी घातलेल्या संघटनेच्या सदस्याने प्राध्यापक टी. जी. जोसेफ यांचा हात कापला होता. त्यातील मुख्य आरोपीला १२ वर्षांनंतर पकडण्यात यश आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने त्याला बुधवारी अटक केली.गेल्या १३ वर्षांपासून सावेद हा फरार होता आणि त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याला केरळमधील कन्नूर येथील मट्टान्नूर येथून पकडण्यात आले.

जानेवारी २०१०मध्ये न्यूमॅन क़लेजच्या मल्याळम विभागाचे प्रमुख असलेले प्राध्यापक टी. जे. जोसेफ यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवाट्टुपुझा येथील पीएफआय संघटनेच्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा हात कापला होता. हल्लेखोरांनी क्रूड बॉम्बचा स्फोट घडवून तेथून पलायन केले होते. या प्रकरणी सावेद हा मुख्य आरोपी होता. जानेवारी २०११मध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. भारतीय दंडसंहिता आणि दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत या प्रकरणातील सुमारे १९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

हा एकाधिकारशाहीचा पराभव

मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!

‘ज्युनियर मुंबई श्री’चा मान मिळाला प्रणव खातूला

त्यातील तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून अन्य १० जणांना आठ वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. हे सर्व आरोपी आता प्रतिबंधित केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते होते किंवा कार्यकर्ते होते. तसेच, जोसेफ यांच्यावर हल्ला करण्याचा गुन्हेगारी कट रचण्यात ते सहभागी होते.उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय गृह मंत्रालयाने २७ सप्टेंबर २०२२ रोजी पीएफआय आणि त्याच्या इतर आठ संस्थांवर लोकांमध्ये जातीय द्वेष पसरवल्याबद्दल आणि देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधक असलेल्या ‘बेकायदा कृत्यांमध्ये’ गुंतल्याबद्दल पाच वर्षांची बंदी घातली आहे.

काय आहे प्रकरण?
इडुकी जिल्ह्यातील थोडुपुझा येथील न्यूमन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील एका मल्याळम प्रश्नपत्रिकेत प्रेषित मोहम्मद यांची कथित थट्टा केल्याचा प्रश्न आला होता. त्यामुळे ४ जुलै २०१० रोजी प्राध्यापकाचा हात कापण्यात आला होता. या हल्लेखोरांनी प्राध्यपकावर त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीतच दिवसाढवळ्या क्रूर हल्ला केला होता, असे एनआयएने म्हटले आहे. प्राध्यापकाचे कुटुंब रविवारी सकाळी चर्चमधील प्रार्थनेवरून घरी परतत असताना सात हल्लेखोरांच्या टोळीने प्राध्यापकांना गाडीबाहेर खेचले आणि त्यांना मारहाण केली होती. त्यातील सावेद या मुख्य आरोपीने प्राध्यापकांचा उजवा हात कापला होता. तसेच, दहशत माजवण्यासाठी बॉम्ब उडवून तेथून पलायन केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा