31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरक्राईमनामामृतदेह लपवण्यासाठी लावली आग; ७६ जणांचा होरपळून मृत्यू!

मृतदेह लपवण्यासाठी लावली आग; ७६ जणांचा होरपळून मृत्यू!

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Google News Follow

Related

ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरात मोठी आग लागून ७६ जणांचा होरपळन मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीत एका धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एका व्यक्तीने अमली पदार्थांच्या तस्कराची हत्या केली होती. त्याचा मृतदेह लपवण्यासाठी त्याने लावलेली आग पसरून मोठी दुर्घटना घडल्याची कबुली या तरुणाने दिली आहे.
आगीच्या कारणांच्या साक्षी घेण्याचे काम सुरू असताना ही बाब समोर आली.

या २९ वर्षीय तरुणाने इमारतीच्या तळघरात या व्यक्तीची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने त्याच्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो मृतदेह पेटवून दिला. हा तरुण अमली पदार्थांचा व्यसनी होता. या साक्षीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि जाळपोळीचे १२० आरोप आहेत. आग कशी लागली असावी, इमारतीमधील सुरक्षायंत्रणेत काही त्रुटी होत्या का, याबाबत सर्वसामान्यांच्या तसेच, इमारतीमधील रहिवाशांच्या साक्षी सुरू असताना त्याने ही कबुली दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या आगीत सुमारे १२ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!

हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार

श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार

या तरुणाने दिलेल्या साक्षीत संपूर्ण इमारतच गुन्हेगारीचा अड्डा झाली होती, असे सांगितले. ही इमारत अमली पदार्थांचे तस्कर चालवत होते. आगीच्या घटनेपूर्वीही इमारतीच्या तळघरात आणखी मृतदेह मिळाले असते, असा दावाही त्याने केला.
पाच महिन्यांपूर्वी लागलेल्या या आगीप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी मंगळवारपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.

पोलिस तपासात इमारतीमधील आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्याचे मार्ग बंद होते किंवा कुलूपबंद असल्याचे आढळले होते. त्यामुळे जीवितहानी वाढल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले होते. आग लागल्यानंतर काही जणांनी सुटकेसाठी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उड्या मारल्या. काही जणांनी त्यांच्या लहान बाळांनीही खिडकीतून खाली फेकले, जेणेकरून खाली असलेली माणसे त्यांना झेलतील, अशी त्यांना अपेक्षा होती. यामुळे अनेकांना दुखापती झाल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा