29.3 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरक्राईमनामानिदा खानला लपण्यास मदत करणाऱ्या नगरसेवक मतीनचे घर जमीनदोस्त

निदा खानला लपण्यास मदत करणाऱ्या नगरसेवक मतीनचे घर जमीनदोस्त

घर अनधिकृत असल्याबद्दल दिली होती नोटीस

Google News Follow

Related

नाशिकमध्ये झालेल्या टाटा कन्सल्टन्सीमधील कॉर्पोरेट जिहादप्रकरणातली प्रमुख आरोपी निदा खानला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरमधील नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर बुधवारी बुलडोझर चालविण्यात आला. निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो फेटाळण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात येणार होती. तेव्हा ते मतीनच्या घरात लपल्याचे स्पष्ट झाले.

मतीन पटेल हा एमआयएम या पक्षाचा नगरसेवक असून त्याच्या मुख्य शहरापासून लांब असलेल्या नारेगाव येथील घरात निदा खान आपल्या कुटुंबियांसह लपली होती. त्यानंतर मतीन पटेल याचे घर जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर महापालिकेने मंगळवारी २४ तास मुदतीची नोटीस चिकटवली होती. त्यानंतर ते घर पाडण्यात आले. त्या घराचे काम इतके कमकुवत होते की, जेसीबीच्या प्रहाराने अख्खे घरच खाली कोसळले.

हे ही वाचा:

तेल कंपन्यांना रोज हजार कोटींचा फटका

आयात शुल्कवाढीनंतर सोने – चांदीच्या दरात विक्रमी वाढ

ट्रम्प-शी भेटीपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात घसरण

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या

मतीन पटेलच्या मालमत्तांवर महापालिकेने यापूर्वी तीन दिवस मुदतीची नोटीस चिटकवली होती. ही तीन दिवसांची मुदत मंगळवारी संपली. पण मतीनने आणखी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र पालिकेने ती मुदत देण्यास नकार दिला आणि २४ तासात माहिती देण्यास सांगितले. ‘एमआयएम’चे मतीन पटेल याचे घर आणि दुकाने बेकायदा असल्याचा दावा करून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली होती.

मतीन पटेलकडून प्रतिवाद

पालिकेने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता त्यामुळे ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा भंग करणारी आहे, असे मतीनच्या वकिलांचे म्हणणे आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा