जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा एआयने जनरेट केलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी बिहार आणि हरियाणा पोलिसांनी कारवाई करत मुल्सिम बाप-लेकाला अटक केली आहे. मोहिबुल हक आणि गुलाम जिलानी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही मांझा पोलीस स्टेशन परिसरातील धोबवालिया गावातील रहिवासी आहेत. या दोघांनी एआयच्या मदतीने विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांचा अश्लील व्हिडिओ बनवला होता आणि तो ‘एसएस रिअल पॉइंट’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
याबाबत गुरुग्राम सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी व्हिडिओची तांत्रिक तपासणी केली आणि ठिकाण आणि स्रोत शोधले. यानंतर, गुरुग्राम पोलिसांनी बिहार पोलिसांच्या सायबर टीमसह आरोपींना अटक केली. कारवाई करत दोघांचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
प्रियंका चतुर्वेदी युरोप दौऱ्याबद्दल काय म्हणाल्या ?
‘किलर मास्क’ घालून रिपोर्टर बनला अक्षय कुमार
त्रिपुरात ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक, एजंटही ताब्यात!
चौकशी दरम्यान, असे आढळून आले की त्यांनी इतर अनेक लोकांचेही असे व्हिडिओ बनवले आहेत आणि सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या प्रकरणात आयटी कायद्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. अटकेनंतर, दोघांनाही गोपाळगंज न्यायालयात हजर करण्यात आले आणि ट्रान्झिट रिमांडवर गुरुग्रामला आणण्यात आले, जिथे पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू राहणार आहे.
