25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरक्राईमनामाबांगलादेशच्या सीमेवरून महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांची घुसखोरी

बांगलादेशच्या सीमेवरून महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांची घुसखोरी

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराकडून खळबळजनक खुलासे

Google News Follow

Related

भारतात रोहिंग्यांची समस्या वाढत असून एकीकडे भारत सरकार त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे बांगलादेशच्या सीमाभागातून शेकडोंच्या संख्येने रोहिग्यांना भारतात आणले जात आहे. एकीकडे देशात बेकायदेशीरपणे स्थायिक झालेल्या ४० हजारांहून अधिक रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तर, बांगलादेशच्या सीमेवर दर महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांना घुसखोरी करून भारतात आणले जात आहे. हे सर्व काम आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणारी टोळी करत असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या पथकाने मानवी तस्करी टोळीचा सूत्रधार जलील मियाँ याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एनआयएकडून त्याची आणि टोळीतील संशयितांकडून चौकशी सुरू आहे. आरोपी जलील मियाँ हा त्रिपुराचा रहिवासी आहे. एनआयएने त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जलील मियाँ हा अटक करण्यात आलेल्या टोळीचा म्होरक्या जिबोन रुद्र पाल उर्फ सुमनचा साथीदार आहे, त्याला यापूर्वी एनआयएने अटक केली होती. जलील मियाँचे सहकारी जज मियाँ आणि शांतो हे अद्याप फरार आहेत. एनआयए त्यांचा तपास सुरू आहे. या सर्वांनी त्रिपुरातून मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या चालवल्या.

हे ही वाचा..

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या राजस्थानमधून आवळल्या मुसक्या

वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!

धक्कादायक: सलूनमध्ये मुस्लिम न्हाव्याने ग्राहकाच्या चेहऱ्याची केली ‘थुंकीने मालिश’!

अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?

बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या टोळीचे सदस्य भारतात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना १० ते २० लाख रुपये देत असून, सीमा ओलांडून भारतात त्यांना बनावट ओळखपत्राद्वारे येथे आणत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी किंवा नंतर रोहिंग्या घुसखोरांना भारतीय उच्चारात हिंदी, आसामी आणि इतर भारतीय भाषांमध्ये ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जात होते. जेणेकरून रोहिंग्या घुसखोर भारतात पोहोचल्यावर त्यांच्या उच्चारावरून ओळखता येणार नाही. शिवाय, घुसखोराने शिकलेली भाषा त्याला भारतातील कोणत्या राज्यात बेकायदेशीरपणे वसवता येईल हे ठरवते. ही टोळी दररोज बांगलादेशातून पाच ते १० लोकांना भारतात घुसवायची. यासाठी बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये भूमिगत बोगदे बांधण्यात आले आहेत. त्यांना भारतात आणल्यानंतर काही दिवस त्यांना अज्ञात स्थळी ठेवण्यात येत होते. यादरम्यान घुसखोरांचे फोटो काढून बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना दिली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा