28 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरक्राईमनामाकुर्ला गोळीबारातील संशयित मनसेचा कार्यकर्ता?

कुर्ला गोळीबारातील संशयित मनसेचा कार्यकर्ता?

या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक

Google News Follow

Related

कुर्ल्यातील सुरजसिंग देवरा या कंत्राटदारावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन प्रमुख संशयितांना अटक केली आहे. गणेश चुक्कल आणि समीर सावंत या दोन फरार संशयितांना सिलीगुडी येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केली असून यांत एक अल्पवयीन आणि इतर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील मनसे कार्यकर्ता गणेश चुक्कल या मुख्य संशयित आरोपी असून त्याची ऑडी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

नाशिकमध्ये टाकून दिलेल्या कारमध्ये दोघे पळून गेल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिलीगुडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. कुर्ल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवळे म्हणाले की ते सिलीगुडी पोलिसांच्या संपर्कात असून त्या संशयितांना मुंबईत परत आणण्यासाठी त्यांची टीम गुरुवारी रात्री पश्चिम बंगालला रवाना झाली आहे. देवरा यांनी वांद्रे ते दहिसरपर्यंत फूटपाथ आणि नाल्यांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाच्या टेंडरसाठी अर्ज केला होता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी – सावंत आणि चुक्कल यांना त्यांचा अर्ज परत घेण्याची धमकी देत ​​होते. देवरा यांनी अर्ज मागे घेतला नाही तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.म्हाडाची ही निविदा ४५ कोटी रुपयांची होती.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून ‘सामना’मध्ये पोटदुखी

रायगड अपघातात चार वर्षीय मूल आश्चर्यकारकरित्या बचावले

मविआने रचलेल्या उद्योगांच्या विटा आहेत कुठे ?

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

काय आहे प्रकरण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची बहीण अलका हिच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याचा आरोप गणेश चुक्कल यांच्यावर करण्यात आला होता पवईतील हिरानंदानी भागात अक्षय कुमार याच्या बहिणीचा एक फ्लॅट असून, तो फ्लॅट तीन वर्षांच्या भाडे करारावर गणेश चुक्कल याला देण्यात आला होता. या भाडेकरारानुसार गणेश चुक्कलला हा फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र, त्यांनी यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. यावेळी आपल्यात तीन नव्हे तीस वर्षांचा करार झल्याचा दावा चुक्कल यांनी केला होता मात्र,अलका यांच्या वकिलाने असा कोणताही करार झाल्याचे अमान्य केले होते. तेव्हा गणेश चुक्कल यांनी संदर्भातील काही कागदपत्रे न्यायलयात सादर केली. मात्र,या कागदपत्रावरील आणि करारावरील सह्या खोट्या असल्याचे अलका यांच्या वकिलाने म्हटल आहे. यानंतर त्यांनी पवई आणि बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती तर, पवई येथे चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सदर प्रकरणात त्यांची चौकशी झाली होती. मात्र, आता एफआयआर दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

आपल्यावरील आरोप खोटे

या प्रकरणी गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणतीही खोटी कागदपत्र सादर केली नाहीत,आपल्यावर लावले गेलेले आरोप खोटे असून, कोर्टात ते सिद्ध होईल असे त्यांनी म्हटले आहे. सध्या अलका यांच्या तक्रारीनंतर पोलीस पुन्हा एकदा गणेश चुक्कल यांची चौकशी करणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा