27 C
Mumbai
Friday, January 20, 2023
घरविशेषरोजगार मेळावा सुशासनाची ओळख

रोजगार मेळावा सुशासनाची ओळख

Google News Follow

Related

नवी दिल्लीमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्तीपत्रांचे वाटप केले आहे. दहा लाख कर्मचार्‍यांसाठी भरती मोहिमेअंतर्गत पंतप्रधान यांच्याहस्ते ७१ हजार तरुणांना ही नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, रोजगार मेळावा आपल्या सुशासनाची ओळख आहे. आमचे सरकार जे सांगते तेच करते आणि हा रोजगार मेळावा याचे उत्तम उदाहरण आहे.

पंतप्रधान म्हणाले, आम्ही ७० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याचे फक्त बोललोच नाही, तर ते करून दाखवून दिले. बदलत्या भारतात केवळ रोजगारच नाही तर स्वयंरोजगाराची पातळीही वाढली आहे. केंद्र सरकारमधील भरती प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

एक वेळ अशी होती की विविध कारणांमुळे नियमित पदोन्नतीही रोखून धरल्या जात होत्या. आता केंद्र सरकारच्या भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. आता, केंद्र सरकारमधील भरती प्रक्रिया अधिक कालबद्ध आणि सुव्यवस्थित झाली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,927चाहतेआवड दर्शवा
1,993अनुयायीअनुकरण करा
60,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा