24 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरविशेषमहाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

सागरपुत्र पॅनलला मिळाले घवघवीत यश

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या त्यात सागरपुत्र सहकार पॅनलने घवघवीत यश संपादन केले. त्यात मच्छिमारांचे जुनेजाणते कार्यकर्ते रामदास संध्ये यांची संचालक म्हणून निवड झाली. या पॅनलच्या १३ उमेदवारांची निवड राज्य संघावर झाली आहे. त्याबद्दल मच्छिमार सहकारी संस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचा हा कार्यकाळ २०२२ ते २०२७ असा असणार आहे. त्यासाठी रामदास संध्ये यांच्या सागरपुत्र सहकार पॅनलने दमदार कामगिरी केली. त्यांचे ११ उमेदवार निवडून आलेच पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणखी २ उमेदवारांचीही निवड झाली. संध्ये हे याआधीही संचालक व अध्यक्ष म्हणून संघावर निवडून आलेले आहेत. पुन्हा एकदा मच्छिमार संस्थांनी त्यांना संधी दिली आहे.

महासंघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका मात्र अद्याप व्हायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संस्था ही राज्यातील सहकारी मच्छिमार सहकारी संस्थाची शिखर संस्था आहे. त्यासाठी झालेल्या मतदानात सागरपुत्र पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले. जवळपास ७५० संस्था राज्य संघाशी संलग्न आहेत.ठाणे, पालघर, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांतून प्रतिनिधी येऊन मतदान करतात.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो, मोदींनी रणशिंग फुंकलंय!

फक्त मोदीच नाहीत, ठाकरेही विकास पुरूषच…

डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा कायापालट होईल

मुघलांचे कर्दनकाळ धर्मवीर महाराणा प्रताप

यासंदर्भात रामदास संध्ये म्हणाले की, मच्छिमारांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय असले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मच्छिमारांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्री आहेतच पण स्वतंत्र मंत्रालय असावे असे आम्हाला वाटते. मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलती मिळायला हव्यात. राज्य शिखरसंघाला शासकीय अनुदान असले पाहिजे. दूध, कापूस, साखर, संघाला जसे अनुदान दिले जाते, जमिनी दिल्या जातात. त्यांच्या संस्था, प्रशिक्षण संस्थांना मदत दिली जाते. मच्छिमारांना दिलेली नाही. उद्दीष्ट आहे. सहा विभागात महाराष्ट्र शासनाने दूध संघासारखे सहकार्य करावे, भूखंड द्यावेत, प्रशिक्षणासाठी मदत करावी. हे आमचे संकल्प आहेत. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या मच्छिमारांपर्यंत पोहोचाव्यात. पण अनेक लोक त्यात दलाली करून त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याला आळा बसून प्रत्यक्ष मच्छिमारांपर्यंत या योजनांचे लाभ मिळावे हा उद्देश.

संध्ये म्हणाले की, पालघरमध्ये फिशरीज कॉलेज करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आम्ही भेटलो आहोत.

महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्यादित या शिखर संघाची सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत संचालक मंडळ निवडणुकिमध्ये रामदास संध्ये यांचे सागरपुत्र सहकार पॅनलचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले.

निवडून आलेले पॅनल असे-

रामदास संध्ये-मुंबई विभाग

जयकुमार भाय-पालघर/ठाणे विभाग

जे. टी. पाटील-सागरी विभाग प्रतिनिधी

मनोहर बैले-रायगड विभाग

रमेश बारी-इतर मागास प्रवर्ग

राजेंद्र मेहेर-विशेष मागास प्रवर्ग

सत्यजित हिरे-३.०० लाख उलाढाल प्रतिनिधी

विजय गिदी-अनु.जाती/जमाती सिराज डोसानी-ब वर्ग वैयक्तीक प्रतिनिधी

ज्योती मेहेर-महिला प्रतिनिधी

अर्पिता कोळी-महिला प्रतिनिधी

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा