33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरक्राईमनामासचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

Google News Follow

Related

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सचिन वाझे याच्या विरोधात आता खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने वाझे विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. वाझे आणि त्याच्या सहकाऱ्याने आपल्याला धमकी देत आपल्याकडून खंडणीची मागणी केल्याचा आरोप या बांधकाम व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही केसेस सध्या भारतभर गाजत आहेत. अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे हा मुख्य आरोपी म्हणून अटकेत आहे. मनसुख हत्या प्रकरणातही वाझेचे नाव आले आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला दर महिना १०० कोटी रुपये खंडणी म्हणून पोहोचवण्याची मागणी केल्याचा आरोप केला होता. या सर्वच प्रकरणात वाझे अडकत चालले असून अशातच आता वाझेवर नवीन आरोप झाला आहे.

हे ही वाचा:

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. वाझे विरोधात तक्रारीच्या या पत्रात महाराष्ट्रातील खंडणी रॅकेट संबंधीही माहिती असल्याचे समजत आहे. महाराष्ट्रात अति महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जागी पोस्टिंग मिळवण्यासाठी कशाप्रकारे एक रॅकेट चालते आणि त्यात कोण दलाल आहेत असे सगळे तपशील त्या पत्रात असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात योग्य तो तपास करण्यात यावा अशी मागणी या बांधकाम व्यावसायिकाने केली आहे.

रिपब्लिक वाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. “वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याकडे खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकीही देण्यात आली. आपण वाझेला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेलो होतो. पण वाझे तिथे भेटला नाही.वाझेच्या सहकाऱ्याने आपल्याला पाच लाख रुपये देण्यास सांगितले.” असे बांधकाम व्यावसायिकाने आपल्या तक्रारित म्हटले आहे. या संबंधित आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स असल्याचा दावाही त्याने केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा