29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरक्राईमनामाएमसीएला ३५ स्मरणपत्रे; पण पोलिसांची १४.८२ कोटी थकबाकी शिल्लकच

एमसीएला ३५ स्मरणपत्रे; पण पोलिसांची १४.८२ कोटी थकबाकी शिल्लकच

Google News Follow

Related

मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यासाठी  सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १४.८२ कोटी थकबाकी वसूल करण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणा-या सुरक्षा शुल्काची विषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती.

मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांना गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -२०, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात केवळ २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.

हे ही वाचा:

मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार

‘सत्ताधारी नेते लॉकडाऊनच्या धमक्या देऊन तणाव निर्माण करतायत’

महाराष्ट्रात दोन वेगळे कायदे आहेत काय?

मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!

 

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र लिहून मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकबाकी न भरल्याबद्दल एफआयआर नोंदवावी आणि जिल्हाधिकार्‍यांकडून पैसे वसुलीसाठी कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा