31 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरक्राईमनामाट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

ट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

या इमारतीला भेट देणाऱ्या किमान ३५ व्यक्तींचा पोलिसांनी शोध घेतला.

Google News Follow

Related

मरोळ परिसरातील एका आलिशान गृहनिर्माण सोसायटीत बहिणीसोबत राहणाऱ्या २३ वर्षीय प्रशिक्षणार्थी हवाई सेविकेची गळा चिरून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी इमारतीमधील कचरा संकलन कर्मचाऱ्याला सोमवारी अटक करण्यात आली. मात्र या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुढील विश्लेषणासाठी तिचे नमुने पाठवून दिले आहेत. सीसीटीव्हीत या आरोपीने रक्ताळलेले कपडे बदलून नव्या कपड्यात तो बाहेर पडल्याचे दिसते आहे.

रुपल ओग्रे असे या तरुणीचे नाव आहे. ती तिच्या चुलत बहिणीसोबत येथे राहात होती. ती सकाळपासून तिच्या फोनवर प्रतिसाद देत नसल्याने एक मैत्रीण रात्री १०च्या सुमारास रुपलच्या घरी तिला पाहण्यासाठी आली होती. मात्र तिने दार उघडले नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला असता पीडित रुपल ओग्रे ही अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या गळ्यावर बाथरूममध्ये वार केले होते.

रुपलचा मृतदेह सापडल्यानंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पवई पोलिसांनी हाऊसिंग सोसायटीचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसह ४५हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतर इमारतीमध्ये कचरा जमा करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याचे नाव विक्रम अठवाल (३५) असे आहे. त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार केल्यामुळे त्याने तिला ठार मारले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रुपलची हत्या करण्यात आली. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याने हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूचा शोध पोलिस घेत आहेत.

हे ही वाचा:

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक

पोलिस पथकाला विक्रमच्या मानेवर आणि हातावर जखमांच्या ताज्या खुणा आढळल्या. तसेच, सीसीटीव्हीमध्ये तो इमारतीमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र इमारतीमधून बाहेर पडताना तो गणवेशात नव्हता. तर, त्याने दुसरे कपडे परिधान केले होते. विक्रम अठवाल (३५) या आरोपीने रुपलच्या फ्लॅटमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ‘तो फ्लॅटची स्वच्छता करण्यासाठी आत गेला. दुपारच्या सुमारास तेथून निघून गेला, परंतु दोन तास इमारतीतून बाहेर पडला नाही. गुन्हा केल्यानंतर, त्याने त्याच्या गणवेशावरचे रक्ताचे डाग धुतले, कपडे बदलले आणि दुपारी दीडच्या सुमारास इमारतीतून बाहेर पडला आणि तो थेट पवईतील त्याच्या तुंगा गावातील घरी गेला. जेव्हा त्याला पकडण्यात आले तेव्हा तो सोमवारी कामावर आला होता,’ अशी माहिती पवई पोलिस अधिकाऱ्याने दिली.

मार्चमध्ये हवाई सेविका (एअर होस्टेस) म्हणून एका खासगी विमान कंपनीत काम करणारी रुपल गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या चुलत बहिणीसोबत, ऐश्वर्यासोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ऐश्वर्या एका आठवड्यापूर्वी त्यांच्या रायपूरच्या घरी गेली होती. ‘ऐश्वर्या आणि रुपलच्या वडिलांनी रविवारी दुपारी दीडनंतर रुपलला फोन केला होता. मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने त्यांना संशय आला. अखेर रात्री नऊ वाजता ऐश्वर्याने तिच्या एका मैत्रिणीला फोन केला आणि तिला रुपलची तब्येत बरी आहे ना, हे तपासण्यास सांगितले. तेव्हा ही घटना उघडकीस आली,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत परिमंडळ १०चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी आठ पथके तयार केली. यात निरीक्षक प्रकाश कांबळे, गणेश पाटील, सहाय्यक निरीक्षक विनोद लाड, उपनिरीक्षक विजय पाटील आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज आणि ‘गेस्ट लॉग बुक’ची तपासणी केली. ‘पोलिसांनी रविवारी सकाळी १० ते दुपारपर्यंत या इमारतीला भेट देणाऱ्या किमान ३५ व्यक्तींचा शोध घेतला. तथापि, ३५ अभ्यागतांपैकी कोणीही हत्येत सहभागी असल्याचे आढळले नाही. यामुळे संशयाची सुई इमारतीचे सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे वळली. तांत्रिक सहाय्याने, आम्ही अठवालच्या मुसक्या आवळल्या,’ अशी माहिती नलावडे यांनी दिली.   गेल्या सहा महिन्यांपासून तो या इमारतीत काम करत आहे. त्याच्या हत्येमागचे खरे कारण अद्याप समजलेले नाही. तसेच, आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नी त्याच इमारतीत घरकाम करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा