दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात दिवसा ढवळ्या पडलेल्या अडीच कोटींचा दरोड्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी अवघ्या १२ तासात उघडकीस आणला आहे.मुंबईतील विविध ठिकाणाहून ५ जणांना अटक करण्यात आली असून दरोड्यात चोरीला गेलेले अडीज कोटींचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
विनायक दळवी आणि मंगेश शिंदे (दोघेही रा.कुर्ला ), शाहनवाज खान (शिवडी) आणि अब्दुल हकीम अब्दुल कादिर आणि संतोष जैन (नागपाडा) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींपैकी एक संतोष जैन हा यापूर्वी तक्रारदाराच्या दागिन्यांच्या कंपनीत काम करत होता आणि त्याला सोने पोहोचवण्याचे मार्ग आणि अंतर्गत कामकाज माहित होते, त्यानेच दरोड्याची योजना आखली होती.
पोलिस तपासात असे दिसून आले की टोळीने अनेक दिवसांपासून दरोड्याचे काटेकोरपणे नियोजन केले होते आणि दरोडा टाकण्यापूर्वी मार्गावर पाळत ठेवली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक कर्ज फेडणे आणि जलदगतीने पैसे मिळवणे हा यामागील हेतू होता.
हे ही वाचा:
पोलीस उपयुक्ताच्या हत्येचा प्रयत्न, रिक्षा चालकाला अटक
इस्रायलची मुत्सदी, जगभरातले दूतावास करणार बंद!
डाव्या विचारधारेतील आणखी एक ‘माफीवीर’
काळबादेवी येथील एका ज्वेलरीतील दोन कर्मचारी सुमारे ३ किलो सोन्याचे बार आणि जुने दागिने घेऊन लोअर परळ येथील दागिने बनविण्याच्या कारखान्यात जात असताना गुरुवारी सकाळी ८ वाजता भायखळा येथील डायना उड्डाणपूल येथे
आले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. दरोडेखोरांपैकी एकाने मागे बसलेल्याला धमकावले आणि सोन्याने भरलेली बॅग हिसकावून घेतली. पाठलाग रोखण्यासाठी त्यांनी स्कूटर देखील घेतली.
नागपाडा पोलिसांनी तसेच गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दरोड्यात वापरल्या जाणाऱ्या मोटारसायकली ओळखल्या. नोंदणी क्रमांकांच्या आधारे, नागपाडा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी संशयितांचा माग काढला आणि त्यांना अटक केली. नागपाडा पोलिसांनी तिघांना पकडले, तर उर्वरित दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींचे पूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत. पुढील चौकशी सुरू आहे.







