30.9 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरक्राईमनामा१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी सापडला डोंबिवलीत

१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी सापडला डोंबिवलीत

महाराष्ट्र एटीएसची कारवाई

Google News Follow

दिवाळीच्या काळात ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. झारखंडमध्ये वाँटेड असलेल्या आणि १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून अटक करण्यात आली आहे. संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोधरे ऊर्फ बुधराम असे या ४५ वर्षीय नक्षलवाद्याचे नाव आहे. झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली.

संजय यादव हा झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील देवगन गावचा रहिवासी आहे. तो प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित असून संघटनेच्या झोनल कमिटीचा सदस्य असल्याचा आरोप आहे. झारखंड सरकारने त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यास किंवा त्याला पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो पोलिसांना चकवा देऊन महाराष्ट्रात आला होता.

हे ही वाचा:

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

व्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवारांची रुग्णालयात भेट

माहितीनुसार, संजय यादव गेल्या सुमारे १० दिवसांपासून ठाकुर्ली परिसरात राहत होता. त्याची माहिती मिळताच ठाणे एटीएसने परिसरात शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो ठाकुर्लीत राहत असल्याचे समोर आले. त्याने येथे कोणाच्या मदतीने आश्रय घेतला होता, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, झारखंडमधून महाराष्ट्रात येण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, तो महाराष्ट्रात नक्षलवादी कारवायांसाठी आला होता का, तसेच त्याचे स्थानिक पातळीवर कोणाशी संपर्क होते, याचा तपास एटीएस करत आहे. त्याच्यासोबत अन्य कोणी साथीदार होते का, याचाही शोध घेतला जात आहे. ठाणे एटीएसने संजय यादवला ताब्यात घेतल्यानंतर झारखंड पोलिसांच्या स्वाधीन केले असून, तेथे त्याला अटक करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा