27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामाएनसीबीने मुंबई पोलिसांना का लिहिले पत्र?

एनसीबीने मुंबई पोलिसांना का लिहिले पत्र?

Related

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून एक महत्त्वाची विनंती केली आहे.

सध्या कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीप्रकरणात एक पंच प्रभाकर साईल हा मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदविणार आहे. त्या अनुषंगाने त्याने एनसीबीकडेही उपस्थित राहावे म्हणून एनसीबीने मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे.

प्रभाकर साईलला २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० नंतर वांद्रे येथील सीआरपीएफ च्या कार्यालयात हजर करावे, अशी एनसीबीकडून मुंबई पोलिसांना कळविण्यात आले आहे. प्रभाकर साईल याने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला आहे. या संदर्भात एनसीबीकडून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
या चौकशीसाठी एनसीबीने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या चौकशीसाठी एनसीबीने पाच अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

या पथकाने बुधवारी समीर वानखेडे यांची चार तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान पंच प्रभाकर साईल याच्याकडे या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करून देखील साईल हा चौकशीला हजर राहिलेला नाही. मागील तीन दिवसांपासून प्रभाकर साईल याच्याकडे मुंबई पोलिसांनी स्थापन केलेली एसआयटी प्रभाकर साईल ची चौकशी करीत आहे. यामुळे एनसीबीने मुंबई पोलिसांना समन्स।पाठवून प्रभाकर साईल याला चौकशीसाठी हजर करावे अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा:

नवाब, जवाब आणि हमाम!

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, अजामीनपात्र वॉरंट जारी

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; ८ जणांनी गमावले प्राण

 

क्रूझप्रकरणात साईल हा पंच होता पण त्याने व्हीडिओ तयार करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना ८ कोटी मिळणार होते, असा दावा केला होता. त्यामुळे सध्या साईलची चौकशी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा