मध्य प्रदेशातील गुना येथे कवी मुनव्वर राणा यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुनव्वर राणा यांनी रामायणाचे लेखक महर्षि वाल्मिकी यांच्या बद्दल अपमानास्पद विधान केले. त्यांनी वाल्मिकींची तुलना तालिबानशी केली. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सुनील मालवीय यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, मुन्नावर राणा यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना या दुखावल्या गेल्या आहेत.
राणा यांनी महर्षि वाल्मिकींची तालिबानशी तुलना करून वाल्मिकी समाज तसेच सोबत हिंदू धर्माचा अपमान केला आहे. त्याचवेळी, गुनाचे एसपी राजेश मिश्रा म्हणाले की, हे प्रकरण सीआरपीसीच्या कलम १५४ अंतर्गत लखनौ पोलिसांकडे सोपवले जाईल. याचे कारण देत त्यांनी सांगितले की, गुन्ह्याचे ठिकाण लखनौ आहे, त्यामुळे हे प्रकरण लखनौ पोलिसांकडे सोपवले जाईल.
तीन दिवसांपूर्वी मुनव्वर राणाविरोधात लखनौच्या हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जाहीर कार्यक्रमात मुनव्वर राणा यांनी महर्षि वाल्मिकी एक डाकू असल्याचेही म्हटले होते. रामायण लिहिल्यानंतर ते देव झाले. राणा असेही म्हणाले होते की, जेव्हा आपण वाल्मिकीचा देव म्हणून उल्लेख करतो, तेव्हा आपण त्याच्या भूतकाळाबद्दलही बोलले पाहिजे. ते पुढे म्हणाले, ‘एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य बदलते. त्याचप्रमाणे, आता तालिबानी दहशतवादी आहेत पण काळानुसार लोकांचे चारित्र्य बदलते. हजरतगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी श्याम शुक्ला यांनी सांगितले धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी वाल्मिकी समाजाचे नेते पीएल भारती यांच्या आरोपावरून मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर
मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या
अंजू बॉबी जॉर्जची ‘शैली’ गाजणार!
शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत?
त्यांनी सांगितले की पीएल भारती यांनी हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामध्ये त्यांनी दावा केला की, मुनव्वर यांनी तालिबानची तुलना महर्षिंशी करून त्यांचा अपमान केल्याने देशातील कोट्यवधी दलितांचे मन दुखावले आहे. त्याचबरोबर यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनाही दुखावल्या आहेत. पीएल भारतीसोबतच आंबेडकर महासभेचे सरचिटणीस अमरनाथ प्रजापती यांनीही मुनव्वर राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.







