30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरराजकारणमहाविकास आघाडीचे थोबाड फुटले...नारायण राणेंना जामीन मंजूर

महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे कारण पुढे करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा झंझावात रोखण्याच्या ठाकरे सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे महाविकास आघाडीचे थोबाड फुटले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सूडबुद्धीने वागत ठाकरे सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक आणि पुणे या ठिकाणी राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या पोलिसांचे पथक राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. तर दमरम्यान संगमेश्वर येथे असताना राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!

रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड येथील न्यायालयात आणले. महाड न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर राणे यांना हजार करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर तब्बल तासभर सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची कोठडी मागितल्याची माहिती मिळत आहे. पण न्यायालयाने या सर्व मानसुब्यांना टाचणी लावली आहे. महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. तर नाशिक आणि पुणे पोलिसांनाही राणे यांचा ताबा देण्यात येणार आहे.

नारायण राणे यांना करण्यात आलेली अटक ही गैर आणि बेकायदेशीर असल्याचे सुरवातीपासूनच भाजपाकडून सांगण्यात येत होते. स्वतः नारायण राणे यांच्यापासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सर्वांनीच ही अटक योग्य नसल्याचे सांगितले होते. त्यावरच आता एक प्रकारे न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,510अनुयायीअनुकरण करा
4,880सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा