30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरक्राईमनामागॅसगळतीच्या घटनेला जबाबदार कंत्राटदार

गॅसगळतीच्या घटनेला जबाबदार कंत्राटदार

Related

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयामध्ये ७ ऑगस्टला गॅस गळती घडल्याची घटना समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच रुग्णालयामधून ५८ रुग्णांना सुरक्षितपणे अन्यत्र हलविले गेले होते. परंतु आता या घडलेल्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल मुंबई अग्निशमन दलाने नुकताच जाहीर केलेला आहे. अहवालानुसार कंत्राटदार या गॅस गळतीस जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यामुळे आता लवकरच या कंत्राटदारावर कारवाई देखील होणार आहे.

एलपीजीऐवजी आता यानंतर रुग्णालयामध्ये पाईप नॅचरल गॅस आता वापरण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे. रुग्णालयातील एलपीजी टॅंकच्या वाल्व्हमध्ये बिघाड झाल्याने ही गॅस गळती झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच आता इंजिनिअरिंग विभागाकडून घडलेल्या घटनेविषयीची चौकशी सुरू आहे. तसेच विलगीकरण केंद्र बांधण्यासाठी आवारामध्ये जेसीबी आणण्यात आली होती. या जेसीबीची धडक लागून असे घडले आहे का याचीही आता खातरजमा करून घेण्यात येत आहे.

पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या घडलेल्या प्रकारावर स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केलेला होता. संबंधित झालेल्या घटनेबद्दल प्रशासनाकडून मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचेही रवी राजा यावेळी म्हणाले होते. त्याचवेळी या घटनेस दोषी असलेल्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी राजा यांनी केली होती.

हे ही वाचा:

सॅल्युट!! लष्करातील महिला आता होणार ‘कर्नल’

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

एमआयडीसीतील गुंडांच्या ‘उद्योगां’नी ठाणे ग्रासले

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आर्थर रोडजवळ आहे. इथे LPG गॅस पाईपलाईन लीक झाली. त्यामुळे तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढलं गेले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास LPG गॅस लीकेज झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या परिसरात गॅसचा वास काही काळ येत होता. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने त्याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न लावता, कस्तुरबा रुग्णालयाकडे धाव घेतली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा