27 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानच नाही तर, ब्रिटन मलेशियामध्येही पोहचवली भारतासंबंधीची माहिती

पाकिस्तानच नाही तर, ब्रिटन मलेशियामध्येही पोहचवली भारतासंबंधीची माहिती

आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना गाझियाबाद पोलिसांकडून अटक

Google News Follow

Related

गाझियाबाद पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली शनिवारी (१४ मार्च) सहा जणांना अटक केली होती. हे आरोपी देशाच्या लष्करी तळांचे आणि संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटो केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर ब्रिटन आणि मलेशियामधील नंबरवर पाठवत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. या टोळीने दिल्लीत काही ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरे बसवले होते, हे कॅमेरा पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी पाकिस्तानात असलेल्या त्यांच्या बॉसला ‘सरदार’ या नावाने हाक मारत असत.

पोलिसांनी या कारवाई दरम्यान, सुहेल मलिक, प्रवीण, राज, शिवा आणि ऋतिक यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या केलेल्या चौकशी दरम्यान पोलिसांनी सहावा आरोपी इरम उर्फ महक याला अटक केली. आरोपींच्या मोबाईल फोनमधून दिल्लीतील आर्मी, बीएसएफ आणि सीआरपीएफ कार्यालयांसह अनेक संवेदनशील ठिकाणांचे ५० हून अधिक व्हिडिओ जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानात राहणारा “सरदार” प्रत्येकाकडे व्हिडिओ आणि लोकेशन मागत असे आणि त्या बदल्यात त्यांना ८,००० रुपये देत असे. इरम उर्फ महक हा टोळीत नवीन सदस्यांची भरती करत असे आणि त्यांच्याशी संवाद साधत असे. “सरदार” च्या सांगण्यावरून, दिल्लीतील दोन ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरे बसवण्यात आले होते आणि त्यांच्या माध्यमातून थेट देखरेख केली जात असे.

याव्यतिरिक्त, अटक केलेल्या आरोपींकडून ब्रिटन आणि मलेशियातील मोबाईल नंबर जप्त करण्यात आले, ज्यावर व्हिडिओ आणि फोटो पाठवले जात होते. तिथून पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच हटवले जात होते. काम पूर्ण झाल्यानंतर, “सरदार”च्या सूचनेनुसार सुहेल हेरगिरी करणाऱ्यांना पैसे देत असे. तो स्वतःचे खाते किंवा युपीआय वापरत नव्हता, तर त्याऐवजी ओळखीच्या किंवा मित्राद्वारे पैसे देण्याची व्यवस्था करत असे आणि त्यांना रोख रक्कम देत असे. पोलिसांनी सर्व आरोपींचे खाते गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या खातेधारकांकडून पैसे हस्तांतरित केले गेले होते त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वाजले बिगुल; ४ मे रोजी निकाल

तीन राज्यांमध्ये स्फोट घडवण्याचा कट उधळला; आरडीएक्स, आयईडीसह तिघांना अटक

आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या

UAE निर्बंधांचा परिणाम; दुबई मार्गावरील अनेक उड्डाणे रद्द

राज याने दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम केले. माहितीनुसार, दिल्ली कॅन्ट रेल्वे स्टेशन आणि आर्मी कॅन्ट क्षेत्राजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. काही काळापूर्वी, राज याने त्याचा फूड स्टॉल बंद करून आयफोन खरेदी केला. संशय बळावताच पोलिसांना कळले की, राज आणि त्याचे सहकारी व्हिडिओ देखील चित्रित करत होते, म्हणून राजला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला राजने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसतसे सर्व गुपिते उलगडू लागली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा