30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाप्रेमविवाहातून एकाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फरफटत आणला रस्त्यावर 

प्रेमविवाहातून एकाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फरफटत आणला रस्त्यावर 

Google News Follow

Related

अंबरनाथमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे, ऐन लॉकडाऊनमध्ये ५ ते ६ जणांच्या एका टोळीने एकाला घरातून बाहेर आणून त्याची दगडाने ठेचून हत्या केली. एवढ्यावर न थांबता या मारेकऱ्यांनी या इसमाचा मृतदेह फरफटत रस्त्यावर आणून फेकून देत तेथून पोबारा केला आहे. हा सर्व थरार एका वाहन चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथमध्ये खळबळ उडवून दिली असून येथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे

स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजार मिळणार

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून विजय नवलगिरी असे त्याचे नाव आहे. अंबरनाथ पूर्व येथील बी कॅबिन परिसरात ही घटना असून विजय नवलगिरी हा तेथीलच छाया अपार्टमेंट येथे पत्नीसह राहण्यास होता. रिक्षा चालक असणारा विजय याचा प्रेमविवाह झाला असून त्याच्या पत्नीच्या  माहेरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता. गुरुवारी दुपारी ५ ते ६ जण विजयच्या घरी छाया अपार्टमेंट येथे आली होते, त्यांनी विजयला घरातून बाहेर काढून लाथाबुक्यांनी मारहाण सुरु केली, त्यानंतर दोघांनी जवळच पडलेला भलामोठा दगड उचलून विजयच्या डोक्यात टाकला, विजय रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडताच मारेकरी एवढ्यावर न थांबता त्यांनी विजयचा मृतदेह फरफटत रस्त्यावर आणून फेकला आणि मारेकरी तेथून पसार झाले. हा सर्व थरार तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने आपल्या मोबाईल फोन च्या कॅमेरात कैद करून व्हिडियो व्हायरल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी जगदीश मुनगड व एका अन्य आरोपीला अटक केली आहे, या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा