बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. सैफ अली खान याच्या घरात शिरलेल्या चोराकडून त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली. सध्या सैफ याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर, पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो हाती लागला होता. त्यानुसार या आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात हल्ला करणारा आरोपी हा हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास आढळून आला होता, अशी माहिती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी ३५ टीम तयार केल्या होत्या. संशयिताने पहाटेची पहिली लोकल ट्रेन पकडली असावी आणि वसई- नालासोपारा भागात तो गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानुसार या भागांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र, आता वांद्रे पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची आता चौकशी केली जात आहे.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Mumbai Police bring one person to Bandra Police station for questioning.
Latest Visuals pic.twitter.com/fuJX9WY7W0
— ANI (@ANI) January 17, 2025
हे ही वाचा:
खराब कामगिरीनंतर बीसीसीआयची खेळाडूंवर १० नियमांची वेसण
तैवानच्या हद्दीत दिसली १३ चीनी विमाने, सात चीन नौदलाची जहाजे!
सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…
आतिशी, संजय सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने थोपटले दंड!
दरम्यान, वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा चेहरा हा सीसीटीव्हीमधील व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या एकूण ३५ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी १५ पथके मुंबई गुन्हे शाखेची असून २० पथके पोलिसांची आहेत.







