29 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क, पुण्यातल्या ६६ जणांची चौकशी

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क, पुण्यातल्या ६६ जणांची चौकशी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित ऑनलाइन संबंध असलेल्या व्यक्तींविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१४ जुलै) पुणे जिल्ह्यातील ६६ जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टी किंवा त्याच्या नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा संशय असून, देशविरोधी कारवायांशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.

दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, ही चौकशी सकाळी ७ वाजल्यापासून एकाचवेळी विविध ठिकाणी सुरू करण्यात आली. या कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. संशयितांची पार्श्वभूमी, त्यांच्या सोशल मीडिया व्यवहारांची माहिती आणि पाकिस्तानी नेटवर्कशी झालेला संपर्क याची सखोल पडताळणी केली जात आहे.

यापूर्वी १० जुलै रोजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने राज्यभर मोठी मोहीम राबवून शहजाद भट्टीशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याचा संशय असलेल्या १०२ व्यक्तींची चौकशी केली होती. या राज्यव्यापी कारवाईसाठी दहशतवादविरोधी पथकाच्या १४ प्रादेशिक युनिटमधील तब्बल ५८ पथके तैनात करण्यात आली होती. पुण्यातील ६६ जणांची चौकशी ही त्याच तपासाचा पुढील टप्पा मानली जात आहे.

प्राथमिक तपासात शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट किंवा एकापेक्षा अधिक खाती तयार करून भारतीय युवकांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून युवकांना देशविरोधी विचारांकडे वळवण्याचा आणि त्यांना विविध कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

दहशतवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार, या नेटवर्ककडून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मुद्द्यांचा वापर करून युवकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. विशेषतः बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना पैशांचे आमिष दाखवून देशविरोधी तसेच समाजविघातक कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ ऑनलाइन संपर्क झाला होता की त्यापुढे काही व्यवहार किंवा कारवाया झाल्या होत्या, याचाही तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी समय रैनाला १० लाखांचा दंड

व्यापारी जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवा!

जगन्नाथ रथयात्रेपूर्वी मोठा कट उधळला; ५ दहशतवादी अटकेत

विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून कुटुंबाचा २० किलोमीटर पाठलाग, गाडीही फोडली

चौकशीदरम्यान संशयितांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. पाकिस्तानस्थित नेटवर्ककडून आर्थिक व्यवहार, सूचना किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळाले होते का, याचाही शोध दहशतवादविरोधी पथक घेत आहे. तपासात पुढे काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा