28.1 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरक्राईमनामाविराटच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा आहे इंजीनियर!

विराटच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा आहे इंजीनियर!

Google News Follow

विराट कोहलीच्या मुलीला सोशल मीडियावरून धमकी दिल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला हैदराबाद येथून अटक केली आहे. त्या आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. हा विकृत व्यक्ती रामनागेश अकुबथिनी असून तो २३ वर्षीय आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला हैदराबादमधून अटक केली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीच्या लहानग्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्लीत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लज्जास्पद कृत्य करणारा हा आरोपी सुशिक्षित आहे. हा तरुण सॉफ्टवेअर इंजीनियर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर टीकेचे धनी व्हावे लागले होते. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावरही टीका केली गेली होती. त्यावेळी विराटच्या १० वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची धमकी या तरुणाने दिली होती. त्याचा शोध घेतला गेला आणि तो हैदराबादला असल्याचे स्पष्ट झाले.

 

हे ही वाचा:

२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?

Nykaa ला बंपर फायदा, मालक अब्जाधीश

नवाब मलिकांच्या पुतळ्याचे भाजपाकडून दहन

लग्नाची गरज काय म्हणणारी मलाला विवाहबद्ध

 

त्या इंजीनियरने विराट आणि अनुष्काबद्दल अयोग्य भाषेत टीका केली होती. त्यावर सोशल मीडियावर टीका झाली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा