30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरक्राईमनामा'बिर्याणी'चे पोस्टमॉर्टेम करा!

‘बिर्याणी’चे पोस्टमॉर्टेम करा!

Google News Follow

Related

पुण्याच्या एसपीमधून फुकट बिर्याणी मागवल्याची पोलीस उपायुक्त प्रियंका नरनवरे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. हे प्रकरण चांगलेच तापले असून भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले असले तरी या खात्याचीच चौकशी करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त नारनवरे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळेच आता भाजपकडून गृहखात्याचेच पोस्टमार्टेम व्हावे,अशी मागणी केली आहे. सरकारच्या आशीर्वादाशिवाय वरिष्ठ आणि मंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिस वसुली करत आहेत, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

बिर्याणी प्रकरणाची सारवासारव करताना नारनवरे यांनी नवीन प्रकरण समोर आणले आहे. नारनवरे यांच्या मते हे षडयंत्र असून, आपल्याला मुद्दाम त्रास दिल्याचं त्या म्हणत आहेत. त्यामुळे या खुलाश्यामुळे हे प्रकरण अधिकच खळबळजनक बनलेले आहे.

१२ वर्षांपासून सुरु असलेले वसुलीचं रॅकेट मोडण्याचा प्रयत्न केला म्हणून नारनवरे यांना बिर्याणी प्रकरणात गुंतवल्याचं नारनवरे म्हणतात. खरंच ही जर रिअल क्लिप असती, मॉर्फ क्लिप नसती तर जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीने माझ्याविरुद्ध तक्रार केली असती. ही क्लिप मॉर्फ करुन जाणूनबूजून माझ्याविरोधात माझं ट्रान्सफर करण्यासाठी, माझं नुकसान करण्यासाठी किंवा माझं डिफेमेशन करण्यासाठी या क्षणाला केली गेली आहे, असं मत प्रियंका नारनवरे यांनी नोंदविलेले आहे.

हे ही वाचा:

आता आर या पार! गोंधळ संपवा, निर्णय घ्या!

विनातिकीट प्रवास, हाच श्वास!

‘कोनशिलेवर मुख्यमंत्र्यांचे नाव, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का नाही?’

अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक बलात्कार

यासंदर्भात गृहखात्याकडून पोलिसांना तंबी देण्यात आली आहे. नको त्या गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी काय बोलावे, काय बोलू नये याविषयी सावधगिरी बाळगा असे आदेशच गृहखात्याकडून देण्यात आल्याचे कळते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा