देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहत असताना झारखंडमध्ये मात्र महाशिवरात्रीच्या उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी झारखंडमधील हजारीबागमध्ये मुस्लीम समाजाकडून महाशिवरात्रीनिमित्त झेंडे आणि लाऊडस्पीकर लावण्यास विरोध करण्यात आला. शिवाय हा वाद वाढताच जवळच्या मदरशातून दगडफेकही करण्यात आली. यावेळी हिंदू पक्षानेही बचावासाठी दगडफेक सुरू केली आणि काही वेळातच परिस्थिती हिंसक झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हजारीबागमध्ये झालेल्या हिंसाचारात एक गाडी, दोन बाईक, एक टेम्पो आणि एका दुकानाचे नुकसान करण्यात आले. ही घटना इचक ब्लॉकमधील डुमरावं गावातील हिंदुस्तान चौकात घडली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तणावपूर्वक वातावरणात घटनास्थळी तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस तैनात आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, इतर आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. आयपीएस स्तुती अग्रवाल यांनी स्थानिक लोकांना परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
#WATCH | Jharkhand | Scuffle and stone pelting incident took place this morning in Ichak area of Hazaribagh district; Adequate security forces deployed in the area
A scuffle and stone pelting took place this morning over using a sound system in Ichak area of Hazaribagh district.… pic.twitter.com/o7xjgsuJyl
— ANI (@ANI) February 26, 2025
हे ही वाचा..
तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर, मी तुझी ईएमआय भरतो
धक्कादायक! पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार!
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची बांगलादेशला भेट
हिमाचल प्रदेश : महाशिवरात्री साजरी करण्यावरून मुस्लिमांनी हिंदूंवर गोळीबार केला
या घटनेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री आणि रांची येथील भाजपा खासदार संजय सेठ म्हणाले की, “ही घटना निंदनीय आणि वेदनादायक असून झारखंड सरकारने अशा लोकांविरुद्ध कठोर भूमिका घेतली पाहिजे. सरस्वती पूजेनंतर मूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार होतो. रामनवमी, होळी, शिव बरात दरम्यान हिंसाचार होतो. आज महाशिवरात्री आहे. झारखंडमध्ये असे का घडते, कारण बांगलादेशी घुसखोर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करत आहेत. भाजप- एनडीए सरकार कुठेही असो. दिल्ली, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथून बांगलादेशी घुसखोरांना ओळखून हाकलून लावले जात आहे.” पुढे ते म्हणाले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याची आणि दंगली, अशांतता टाळण्याची विनंती करतो. बांगलादेशी घुसखोर हक्काचा वाटा हिसकावून घेत असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यांना ओळखून भारताबाहेर पाठवून द्या.