27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामापरमबीर यांनी मागितला ईडीकडे अवधी

परमबीर यांनी मागितला ईडीकडे अवधी

Google News Follow

Related

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील  १०० कोटीच्या कथित वसुली प्रकरणी ईडीने मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स पाठवले होते. मात्र आजाराचे  कारण देत परमबीर सिंग यांनी ईडीकडे सोमवारी वेळ मागितला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे मुंबईतील बार मालकाकडून १०० कोटीची वसुली करून द्यावी, असे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री यांना पाठवले होते.या प्रकरणीं उच्च न्यायालयात याचिका दाखल होताच न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. त्यानंतर ईडीने या प्रकरणात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि खाजगी सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडीकडून याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

राष्ट्रवादी, शिवसेनेला कापरं भरलं म्हणून त्यांनी पाळत ठेवली असावी

महाविकास आघाडीने बनवले महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी 

दरम्यान १०० कोटीं वसुलीचे पत्र देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील ईडीने समन्स पाठवले असून या प्रकरणात परमबीर यांची चौकशी करून जबाब नोद करण्यासाठी परमबीर सिंग यांना समन्स देण्यात आले होते. सोमवारी सिंग यांना ईडी कार्यालयांत हजर राहायचे होते. मात्र आपण सुट्टीवर असून आजारी आहे, हे एका शस्त्रक्रिया देखील आपल्यावर पार पाडायची असल्याचे सांगून परमबीर सिंग यांनी ईडीकडे वेळ मागितला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा