काळबादेवी येथील दवा बाजार येथे अनधिकृत पे-अँड-पार्क झोनचा पर्दाफाश करण्यात आल्याच्या चार दिवसांनी पोलिसांनी दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार आणि चिरा बाजार परिसरात आणखी दोन बेकायदेशीर पार्किंग झोनचा पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एक राजेश कहार हा भुलेश्वर येथील एका बागेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि बनावट पार्किंग झोनचा मालक म्हणून वाहने बेकायदेशीर पार्क करून घेत होता. कहार आणि मोहन लोकरे या दोन जणांविरुद्ध फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये
वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान
वाजवा रे वाजवा! आता विवाहसोहळ्यात बॉलीवूड गाण्यांना बंदी नाही
सीमावर्ती गावांचा विकास करणाऱ्या वनविधेयकाला मंजुरी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील ऑरम मॉलमध्ये काम करणाऱ्या मितेश जैन नावाच्या सोनाराच्या तक्रारीनंतर एक गुन्हा दाखल करण्यात आला. भुलेश्वर येथील मुंबादेवी गार्डनच्या शेजारी असलेल्या कामनाथ महादेव मंदिराजवळ तो आपली दुचाकी पार्क करत असे.जैन आणि त्यांचे सहकारी २०२० पासून या ठिकाणी पार्किंग करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी महिन्याला ८०० रुपये देत होते.
बेकायदेशीर पार्किंग झोनमध्ये पार्किंग करण्यात आलेल्या अनेक वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ई-चलान मिळाल्याचे समजल्या नंतर जैन यांना धक्का बसला. चौकशी केल्यानंतर ज्या ठिकाणी जैन आणि इतर व्यापारी वाहने पार्क करीत होती त्या ठिकाणी कुठलेही पे अँड पार्क नसल्याचे उघडकीस आले.
फसवणूक झाल्याचे कळताच अनेक वाहन चालकांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात बेकायदेशीर पार्किंग झोन चालविणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली, या प्रकारच्या तक्रारी लोहार चाळ, चिरा बाजार,मुंबा देवी येथील वाहन चालकांनी पोलीस ठाण्यात केली. दरम्यान लो. टी. मार्ग पोलिसांनी फसवणूक आणि वाहतूकीचे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बेकायदेशीर पार्किंग झोन उध्वस्त करण्यात आले आहे.







