30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामापुण्यातून संशयित दहशतवाद्याला उचलले; आयसीस मॉड्युल प्रकरणात पाचवी अटक

पुण्यातून संशयित दहशतवाद्याला उचलले; आयसीस मॉड्युल प्रकरणात पाचवी अटक

डॉ. सरकार हा देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवत होता

Google News Follow

Related

मुंबई, ठाण्यातील कारवाई नंतर एनआयए ने पुण्यातील कोंढवा येथून आयसीस मॉड्युल प्रकरणात एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एनआयए ने केलेली ही पाचवी अटक आहे. डॉ.अदनानली सरकार (४३) असे पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे.

एनआयएने अटक करण्यात आलेल्या डॉ.सरकार यांच्या कोंढवा येथील घराची झडती घेतली असता झडती दरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसीसशी संबंधित अनेक दस्तऐवज तसेच गुन्हेगारी कृत्य करण्या साठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आयसीस या संघटनेसोबत असलेला डॉक्टर सरकार याचे सबंध आणि निष्ठा समोर आले असून डॉ. सरकार हा असुरक्षित तरुणांना प्रेरित करून आणि त्यांना आयसीसमध्ये भरती करून आयसीस या संघटनेच्या हिंसक कार्यक्रमाला चालना देण्याची त्याची भूमिका उघडकिस आली आहे.

हे ही वाचा:

आयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

दक्षिण मुंबईतील अनेक बेकायदेशीर पे अँड पार्क उद्ध्वस्त!

सीमावर्ती गावांचा विकास करणाऱ्या वनविधेयकाला मंजुरी

मुंबईला पावसाने झोडपले, चर्चगेट जलमय, उपनगरात दमदार

एनआयएच्या तपासानुसार, डॉ. सरकार हा देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न करत होता आणि आयएसआयएसच्या कटाचा भाग म्हणून भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारत होता असे एनआयएच्या तपासात समोर आले.

डॉ. सरकारच्या अटकेनंतर या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. २८ जून रोजी एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात ३ जुलै रोजी एनआयएने यापूर्वी चार जणांना मुंबई ठाणे आणि पुणे येथून अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा