29.5 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरक्राईमनामापहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर

संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्य म्हणजे पर्यटकांवर गोळीबार करताना त्यांची ओळख पटविण्यात आली. ते मुस्लिम नाहीत, हिंदू आहेत हे पाहूनच त्यांना मारण्यात आले. यानंतर जम्मू- काश्मीरमधील सुरक्षा हालचाली वाढल्या असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. अशातच पहलगाम पर्यटक हल्ल्यामागील एका दहशतवाद्याचा फोटो समोर आला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो घटनास्थळाचा असून त्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोत दहशतवाद्याचा चेहरा दिसत नसून तो पाठमोरा उभा आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. एनआयएचे पथक श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथके देखील उपस्थित आहेत. लष्कर, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. मुघल रोडवर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दुर्घटनेला प्रतिसाद म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि गुन्हेगारांना सोडणार नाही, असे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये पोहचले असून नरेंद्र मोदी यांनीही त्यांना जलद कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आणि अशा कृत्यांचा निषेध केला पाहिजे असे म्हटले.

हे ही वाचा : 

जम्मू-काश्मीर: दहशतवादी म्हणाला, ‘जा आणि मोदींना सांगा’

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा

हिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू

मुंबईत दहा कोटींच्या अफगाण चरससह दोघांना अटक

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांसह २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन कुरणात येणाऱ्या पर्यटकांवर सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा