27 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरक्राईमनामामोटारसायकलला टेम्पोची धडक, पोलीस कॉन्स्टेबल पुलावरून पडला खाली

मोटारसायकलला टेम्पोची धडक, पोलीस कॉन्स्टेबल पुलावरून पडला खाली

टेम्पो चालकावर कारवाई

Google News Follow

Related

एका टेम्पोने पोलीस कॉन्स्टेबलच्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिली,या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल उड्डाणपुलावरून खाली पडल्याने गंभीरीरित्या जखमी झाला असून त्यांना तात्काळ नजीकच्या रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी लोअर परळ येथील फिनिक्स मॉल जवळ घडली.याप्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी येथे राहणारे पोलीस कॉन्स्टेबल अजित सुर्वे असे जखमी कॉन्स्टेबलचे नाव असून सुर्वे हे वांद्रे पोलीस ठाण्यात तैनात असून वरळी येथे कुटूंबासह राहण्यास आहे. मंगळवारी सायंकाळी अजित सुर्वे हे ड्युटीवर जाण्यासाठी बुलेटने निघाले होते, लोअर परळ येथील फिनिक्स मॉल समोर असलेल्या उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली, या धडकेत पोलिस कॉन्स्टेबल अजित सुर्वे हे मोटारसायकल वरून उडून उड्डाणपुलाखाली कोसळले, त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

हे ही वाचा:

एक अर्धवट देखणी, एक अर्धवट…

गोवा विशेष : आता काही महिने नाही, वर्षभर पर्यटन!

लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा स्फोट

पीएम सूर्य घर योजनेचा २६ लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा

त्यांना इतर वाहन चालकांनी तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा