Police Killed Himself With His Gun At Lok Bhawan
29.1 C
Mumbai
Thursday, July 9, 2026
घरक्राईमनामालोकभवनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

लोकभवनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

स्वतःच्या पिस्तुलातून झाडली गोळी

Google News Follow

Related

मुंबईतील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या ‘लोकभवन’ परिसरात सोमवारी एका एसआरपीएफ (SRPF – राज्य राखीव पोलीस दल) जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

रोनाल्डोचा अखेरचा विश्वचषक!

कृत्रिम दूध भेसळीवर मोठा घाव; २० हजार लिटर दूध नष्ट

गांगुलींच्या एका निर्णयाने बदलले धोनीचे नशीब

सुप्रिया सुळे म्हणतात, महाराष्ट्रात आणीबाणी घोषित करा!

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच धावपळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेनंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, पुढील तपास मलबार हिल पोलीस करत आहेत.

जवानाने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, जवानाच्या सहकाऱ्यांकडेही चौकशी केली जात आहे. या दुर्देवी घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा