शनिवारी सायंकाळी मुलुंड-ऐरोली रस्त्यावर एसयूव्ही चालवणाऱ्या एका व्यक्तीने सिमेंट मिक्सरच्या सहाय्यकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. यानंतर रबाळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलजवळ ट्रकचा कारला धक्का लागला. कारमधून दोन लोक उतरले. त्यांनी सहाय्यकाला कारमध्ये बसवले आणि घेऊन गेले. यानंतर सहाय्यक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. तपास करत पोलीस थेट पूजा खेडकरच्या आईच्या घरी म्हणजे मनोरमा खेडकर हिच्या घरी पोहोचले. मनोरमा खेडकरने नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण केलं आणि त्याला पुण्यात नेऊन घरात डांबून ठेवलं होतं. दरम्यान, चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला आणि दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला समन्स बजावले आहे.
नवी मुंबईतील सिग्नलवर ट्रकचा एका कारला धक्का लागला. ही कार मनोरमा खेडकरची असल्याचे बोलले जात आहे. त्या घटनेपासून ट्रकचा सहाय्यक बेपत्ता होता. प्रल्हाद कुमार असे त्याचे नाव असून, तो मिक्सर ट्रक घेऊन निघाला होता. कारला ट्रकचा धक्का लागल्यानंतर दोन लोक कारमधून उतरले आणि त्यांनी बळजबरी प्रल्हाद याला खाली उतरवले. त्यानंतर त्यांनी त्याला कारमध्ये बसवले आणि निघून गेले. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कारचा ठिकाणा शोधला. तेव्हा ही कार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील घराबाहेर दिसली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा प्रल्हाद याला घरात डांबून ठेवलेले असल्याचे आढळून आले. एसयूव्हीचा चालक सध्या फरार आहे. पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेजस्वी यादव यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा!
भारत- रशिया संबंध बिघडवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील!
पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवला ‘जलेबी बेबी’
एक कोटींचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यासह दोघांचा खात्मा
तक्रारदार विलास ढेंगरे (५३), जे सिमेंट मिक्सरचे मालक आहेत, त्यांनी सांगितले की त्यांचे चालक चांदकुमार चव्हाण यांनी त्यांना सांगितले होते की एसयूव्हीला मुलुंड ऐरोली पुलावरील सिग्नलवर धक्का लागला होता. वाद झाल्यानंतर, एसयूव्ही चालकाने ट्रकच्या क्लीनर प्रल्हाद कुमार (२२) ला रबाळे पोलिस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. मात्र, पुढे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास चव्हाण यांनी ढेंगरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की प्रल्हाद त्यांचे फोन उचलत नाहीत. त्यानंतर चव्हाण आणि ढेंगरे सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे भेटले आणि त्यांनी प्रल्हादचा शोध सुरू केला. मात्र, यश न आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.







