31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामापुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!

पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!

नागरिकांसह पोलिसांची बघ्याची भूमिका

Google News Follow

Related

पुण्यातील कोयत्या गँगने पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे.विशेष म्हणजे पोलिसांसमोरच एका गटाने दुसऱ्या गटावर कोयत्याने मारामारी करत असल्याचे समोर आले आहे.पुण्यातील वडगाव शेरी भागात काल रात्री ही घटना घडली.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे.एकीकडे पोलीस सातत्याने प्रयत्न देखील करत आहेत.मात्र,पुण्यातील कोयता गँगची दहशत थांबायचं नाव घेत नाहीये.तशीच घटना काल रात्री पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली.दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.विशेष म्हणजे पोलिसांसमोरच ही घटना घडली.या ठिकाणी एक महिला पोलीस देखील उपस्थित होत्या त्यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडत होता.पोलिसांसमोर घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

हे ही वाचा:

चॅट जीपीटीला रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ‘भारत जीपीटी’ देणार टक्कर

अयोध्या; चौरासी (८४) कोसी परिक्रमा परिसरात ‘दारू बंदी’!

डीएमडीके प्रमुख आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन!

रामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!

घटनास्थळी उपस्थित असणारी महिला पोलीस कोयता घेऊन हल्ला करणाऱ्या गटाला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, हल्लेखोर तरुण कोयत्याने हल्ला करत होते.तसेच हातात दगड घेऊन मारहाण करत होते.तसेच परिसरातील नागरिकांनी भीतीने बघ्याची भूमिका घेतली.या हाणामारीत दोन ते तीन जण गंभीर रित्या जखमी असल्याची माहिती आहे.याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु कोयता गँगचा वाढत चाललेला हैदोस पोलिसांचे अपयश दाखवत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा