27 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामादर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट

दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट

बेपत्ता राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

Google News Follow

Related

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशयाची सुई होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. त्यामुळे तिची हत्या राहुल याने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या तपासानुसार, राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. त्यानंतर पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण होऊन ती लवकरच वन विभागात रुजू होणार होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

हे ही वाचा:

मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’

पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू

कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी

पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. दर्शना पवार ही तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा