बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा यांना ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तसेच १५ सप्टेंबर रोजी राज कुंद्रा यांना या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. राज कुंद्रा यांना यापूर्वी १० सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते परंतु त्यांनी हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागितला होता.
राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार असून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ६०.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा देशाबाहेर जाऊ नयेत म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर जारी केले आहे.
जुहू पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून तक्रारदार लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की, २०१५ ते २०२३ दरम्यान त्यांनी व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने शिल्पा- राज यांच्या कंपनीमध्ये ६०.४८ कोटी रुपये गुंतवले होते. कोठारी यांचा आरोप आहे की हे पैसे व्यवसायात गुंतवण्याऐवजी शिल्पा आणि राज यांनी ते त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. तसेच त्यांना आश्वासन देण्यात आले होते की १२% वार्षिक व्याजदराने पैसे निश्चित वेळेत परत केले जातील. परंतु, काही महिन्यांतच शिल्पा यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि नंतर कंपनीविरुद्ध १.२८ कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला सुरू असल्याचे उघड झाले. व्यावसायिकाचा दावा आहे की त्यांना याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या प्रकरणात, कंपनीच्या नावावर घेतलेले पैसे वैयक्तिक खर्चावर खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा..
सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा; नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?
दिवसा फुग्यांची विक्री अन रात्री घरफोडी, ‘वटवाघूळ टोळी’चा पर्दाफाश!
इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी
एकेटीयू दीक्षांत समारंभात शुभांशु शुक्ला यांना मानद पदवी
दीपक कोठारी यांचे वकील जैन श्रॉफ यांचे म्हणणे आहे की त्यांच्या कोठारी यांनी पूर्ण पुराव्यांसह गुंतवणूक केली होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर करून त्यांची दिशाभूल केली आणि पैसे वैयक्तिक वापरासाठी वापरले. शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.







