28 C
Mumbai
Saturday, January 17, 2026
घरक्राईमनामाबंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तीपूर परिसरात बुधवारी रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली. परिसरातील नागरिक त्यांच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसत आहे.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटा या भागात रवाना करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना बेहरामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली, असा आरोप भाजपच्या बंगाल युनिटने केला आहे. ‘प्रशासनाच्या योग्य त्या परवानग्या घेऊन शांततेत निघालेल्या रामनवमीच्या मिरवणुकीवर शक्तीपूर येथे हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी ममता यांच्या पोलिसांनी या भीषण हल्ल्यात हल्लेखोरांमध्ये सामील होऊन रामभक्तांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

बेरहामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही बुधवारी संध्याकाळी या भागाला भेट दिली. ‘मी मालदा येथून जखमी झालेल्या नागरिकांना पाहण्यासाठी आलो होतो. परंतु भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा करत निदर्शने केली आणि माझ्याकडे जाब विचारला. आंदोलन करणाऱ्यांनी यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांना जाब विचारावा,’ असे ते म्हणाले.

‘एका निश्चित कटाचा भाग म्हणून दंगली घडवून आणल्या जात आहेत आणि भाजपच्या निदर्शनांनी ते सिद्ध होत आहे. मी निवडणूक आयोगाशी बोललो आहे. शक्तीपूरला अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला आहे आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी आहेत. मी निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात आहे,’ असे काँग्रेस नेते म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या दिवशी दंगल भडकवली जाऊ शकते, असा इशारा दिल्यानंतर ही घटना घडली आहे. निवडणूक आयोगाने मुर्शिदाबादच्या पोलिस उपमहानिरीक्षकांना जिल्ह्यातील हिंसाचार आणि अधिकारी या भागात देखरेख ठेवण्यात कमी पडले, या मुद्द्यावरून हटवण्यात आल्यानंतर बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया आली होती.

‘आजही भाजपच्या सूचनेनुसार मुर्शिदाबादचे पोलिस उपमहानिरीक्षक बदलण्यात आले. आता मुर्शिदाबाद आणि मालदा येथे दंगल झाली तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल. भाजपला दंगल आणि हिंसाचार घडवण्यासाठी पोलिस अधिकारी बदलायचे होते. जर एकही दंगल झाली तर निवडणूक आयोग जबाबदार असेल कारण ते येथे कायदा आणि सुव्यवस्था पाहात आहेत,’ असे ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले. याआधी बुधवारी ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर राज्यात दंगल भडकवण्याची योजना आखली जात असल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा:

२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

मतदानाच्या दिवशी कूचबिहारला भेट देऊ नका!

एकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे

‘दंगल घडवण्याचा त्यांचा कट आहे. दंगल आणि मतांची लूट करून ते (निवडणूक) जिंकतील,” असा आरोप ममता बॅनर्जी यांनी एका निवडणूक प्रचार सभेत केला. बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमीच्या उत्सवातही हिंसाचार झाला होता, ज्यामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष झाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा