36 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरक्राईमनामामीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

शिवाजी पार्क येथे तणावपूर्ण परिस्थिती

Google News Follow

Related

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या परिसरात जमण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला आहे. रात्री कोणीतरी लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्यावर आणि पुतळ्याच्या पायथ्याशी लाल रंग पडलेला आढळले. यानंतर ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक तातडीने शिवाजी पार्क येथे जमा झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी तात्काळ पुतळ्याची साफसफाई सुरू केली. त्यांनी पुतळ्यावरील रंग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक मानायचे. १९९५ साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे,” असे अनिल देसाई म्हणाले.

हे ही वाचा : 

… म्हणून कर्कला मारले; आरोपी रॉबिन्सनने पार्टनरला काय सांगितले?

समर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?

अमेरिकेला दोहा हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती! काय सांगतोय अहवाल?

नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांचा कॉल; रशिया युक्रेन युद्धावर काय केले भाष्य?

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही निषेध व्यक्त करत म्हटले आहे की, या घटनेचा निषेधच आहे. पोलीस निश्चितच याप्रकरणी गंभीर अशी दखल घेऊन याच्या मुळाशी जाऊन हे कोणी केलंय हे जनतेसमोर आणतील आणि ते आणायलाच हवं. कारण अशाप्रकारची प्रवृती एकतर विकृत मानसिकता असू शकते. किंवा यामागे काही षडयंत्र आहे का हे देखील पाहायला लागेल. याचं कोणीही समर्थन करणार नाही. आम्ही याचा निषेधच करु. मीनाताई या आदरणीय होत्या. या व्यक्तीच्या पुतळ्यावर जर अशाप्रकारे रंग फेकला जात असेल तर हे निषेधार्थ आहे आणि मी स्वतः याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा