32 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामाअँटिलिया प्रकरणातला सूत्रधार सचिन वाझेला जामीन

अँटिलिया प्रकरणातला सूत्रधार सचिन वाझेला जामीन

स्फोटके, मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी

Google News Follow

Related

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुमारे साडेपाच वर्षांच्या कारावासानंतर वाझेला जामीन मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने त्याच्यावर अनेक कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र, इतर प्रकरणातही सचिन वाझे आरोपी असल्याने तो तुरुंगातून अद्याप तरी बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

सचिन वाझेला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर जामीन देण्यात आला आहे. पासपोर्ट असल्यास तो राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाईपर्यंत सचिन वाझेला मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत प्रवेश करण्यास किंवा तेथे राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, न्यायालयीन कामकाजासाठी या जिल्ह्यांमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, वाझेने त्याचा सध्याचा राहत्या ठिकाणाचा पत्ता सात दिवसांच्या आत एनआयएला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दर रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

जामीन देताना न्यायालयाने सचिन वाझेला महत्त्वाच्या साक्षीदारांशी संपर्क न करण्याचे तसेच प्रकरणातील पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्याकडे २४ तास पूर्ण चार्ज असलेला मोबाइल फोन ठेवण्याची अटही घालण्यात आली आहे. एनआयएला आवश्यकतेनुसार त्याच्याशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे त्याची उपस्थिती तपासता येणार आहे.

हे ही वाचा:

दहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

संभल हिंसाचारातील आरोपीची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गातील अटक रद्द

गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत

बलुच सशस्त्र महिलांनी केला नऊ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने १ ऑगस्ट २०२६ रोजी सचिन वाझेसह १० आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. आरोपींवर हत्या, खंडणी, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप आहेत. आरोपींनी हे आरोप नाकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू आहे. २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत आढळला होता. या दोन्ही घटनांचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा