33 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरदेश दुनियादहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

दहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

जयशंकर यांच्याकडून अमेरिकेला स्पष्ट संदेश

Google News Follow

Related

भारत-अमेरिका संबंधांमध्ये व्यापार, शुल्क आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चिंतेची भागीदार देशांकडून पुरेशी दखल घेतली गेली नाही, तर त्याचा परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होऊ शकतो, असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

न्यूयॉर्कमध्ये एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात माजी अमेरिकी मुत्सद्दी डॅनियल रसेल यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी भारत-अमेरिका संबंधांबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी दहशतवाद हा भारतासाठी प्रमुख चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. “भारतासाठी विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दहशतवाद. अनेक दशकांपासून शेजारी देशाकडून जाणीवपूर्वक धोरणाचा भाग म्हणून ज्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना भारताला करावा लागला आहे, तसा अनुभव फार कमी देशांना असेल,” असे जयशंकर यांनी सांगितले. भारताच्या दहशतवादविषयक चिंतेबाबत भागीदार देशांना पुरेशी समज, जाणीव किंवा सहानुभूती नसेल, तर त्यातून संबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. “माझ्या प्रमुख चिंतांपैकी एखाद्या चिंतेला माझ्या भागीदाराकडून पूर्णपणे महत्त्व दिले जात नसेल, तर त्याचा संबंधांवर परिणाम होतो,” असे ते म्हणाले.

दरम्यान, भारत-अमेरिका संबंधांमध्ये सध्या व्यापार कराराच्या वाटाघाटी, अमेरिकेच्या शुल्क धोरणातील बदल आणि इतर प्रमुख देशांशी दोन्ही देशांच्या संबंधांच्या दृष्टिकोनातील फरक यांसारखे मुद्दे चर्चेत आहेत. जयशंकर यांनी सांगितले की, भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही ‘अडथळे’ निर्माण होण्यामागे व्यापार कराराच्या वाटाघाटींचा वेग आणि त्यातील गुंतागुंत हे प्रमुख कारण आहे. भारतातील मोठ्या संख्येने छोटे उत्पादक, कृषी उत्पादक आणि कारखाने यांच्याशी संबंधित विविध हितसंबंधांचा विचार व्यापार कराराच्या चर्चेत करावा लागत असल्याने प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनते, असे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

संभल हिंसाचारातील आरोपीची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गातील अटक रद्द

गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत

बलुच सशस्त्र महिलांनी केला नऊ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

अमेरिकेच्या शुल्क धोरणातील बदलांमुळेही व्यापार चर्चेत अनिश्चितता वाढल्याचे जयशंकर यांनी सांगितले. अमेरिकेतील परस्पर शुल्काशी संबंधित प्रक्रिया बदलल्यानंतर कलम ३०१ अंतर्गत नवी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, भारत-अमेरिका संबंधांमधील चर्चेचा केंद्रबिंदू केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून भारताच्या सुरक्षा चिंतांनाही भागीदार देशांनी समजून घेणे आवश्यक आहे, हा संदेश जयशंकरांच्या वक्तव्यातून समोर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा