30 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरक्राईमनामासचिन वाझेचा जामीन न्यायालयाने फेटाळला

सचिन वाझेचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Google News Follow

मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेने आपल्या जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. मात्र वाझेचा विशेष न्यायालयाने वाझेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सचिन वाझे हा या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा मुख्य दुवा आहे. तरीही सचिन वाझेने मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी ईडीकडे प्रस्ताव दिला होता. सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत त्याच्याविरुद्ध प्रक्रिया जारी केल्यानंतर वाझेने विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल राकडे यांच्याकडे वकील सजल यादव आणि हर्ष गांगुर्डे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आता मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.

जर वाझेला जामीन दिला गेला तर तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो यामुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. वाझेचे उच्च पदावरील राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी संबंध आहेत, यामुळे त्याला जामीन मिळाल्यास तपासात अडथळा येईल, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

अँटिलिया स्फोटके प्रकरणी आणि मनसुख हिरेनच्या खुनाप्रकरणी एनआयएने सचिन वाझेला अटक केली होती. वकील यादव यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी वाझेसाठी जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने वाझेच्या जामिनाचा अर्ज फेटाळला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा