उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील मदिहान पोलिसांनी दुर्गा देवीचा अवमान करणाऱ्या गाण्याच्या प्रकरणात गायिका सरोज सरगम आणि तिचा पती राममिलन बिंद यांना अटक केली आहे. देवीबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्द असलेले गाणे सादर केल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना या प्रकरणाचे मुख्य आरोपी घोषित करण्यात आले आहे.
गायिका सरोज सरगम ने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्यांनी दुर्गा देवीचे वर्णन करण्यासाठी अपशब्दांचा वापर केला होता. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. अनेकांनी देवीची विटंबना झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ही अटक केली.
मिर्झापूरचे एसएसपी सोमेन वर्मा यांनी सांगितले की ही गंभीर बाब आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि समाजात द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवला. एसएसपी म्हणाले की पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि दोन्ही आरोपींना अटक केली.
हे ही वाचा :
नेपाळमधील हिंसाचारात माजी पंतप्रधानांच्या पत्नी गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी भारतात हलवले!
कुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?
स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला की “हे” काम करा!
या विरोधकांपेक्षा अभिषेक शर्मा बरा!
तपासात असेही उघड झाले की सरोज सरगमच्या पतीने गाण्याच्या शूटिंग आणि अपलोडमध्ये मदत केली होती आणि त्यामुळे दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की अशा कृत्यांना खपवून घेतले जाणार नाही आणि अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी या गाण्याचा व्हिडिओ हटवण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे.
यूट्यूब पर सरोज सरगम द्वारा अपने चैनल पर एक गाने का वीडियो अपलोड कर माँ दुर्गा के बारें में अपशब्दों का प्रयोग किया गया था। मड़िहान पुलिस द्वारा FIR पंजीकृत कर मुख्य आरोपी सरोज सरगम व उनके पति राममिलन बिन्द की गिरफ्तारी के सम्बन्ध में #सोमेन_बर्मा #SSP_Mirzapur की बाइट- pic.twitter.com/6gBw8e5pHB
— Mirzapur Police (@mirzapurpolice) September 23, 2025







