32 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरक्राईमनामाअमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई

अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई

प्रकरणातील आणखी एक आरोपी उजेर खान इक्बाल खानला अटक

Google News Follow

Related

अमरावतीमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी १९ वर्षीय अयान अहमद तनवीर आणि उजेर खान इक्बाल खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अयान याने सुमारे १८० मुलींना लक्ष्य करून ३५० हून अधिक व्हिडिओ चित्रित केले. यानंतर आता आरोपी अयान याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणातील आरोपी अयान याच्या घरावर नगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. अयान याचे घर दोन मजल्याचे आहे. दुसऱ्या मजल्याची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला असून आता नगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. अयान याच्या घरावर दुसऱ्या मजल्याबाबत नोटीस लावली असून या नोटीसीची वेळ संपल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रकरण काय?

परतवाडा येथील अयान अहमद तनवीर (वय १९) याने अनेक मुलींशी जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले होते. हे व्हिडीओ अयानचा मित्र उजेर खान इक्बाल खान याने सोशल मीडियावर व्हायरल केले. गेल्या तीन दिवसांपासून हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा:

अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी उजेर खान इक्बाल खानला अटक

खारघरमध्ये २० एकरांवर ‘आफ्रिका ट्रेड हब’ उभारण्याची CIDCOची योजना

राघव चढ्ढा यांच्या जागी निवडलेल्या मित्तल यांच्यावर ईडीचे छापे

बंगाल कोळसा घोटाळा प्रकरण: आय-पॅकच्या सह-संस्थापकांच्या कुटुंबियांना समन्स

या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. तसेच आरोपींचे मोबाईल जप्त केले असून सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येत आहेत. सोशल मीडियावरून हे व्हिडिओ हटवण्यासाठी संबंधित कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनी न घाबरता महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा