33 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026
घरक्राईमनामासुरक्षा रक्षकाची चाकूने हत्या; किरकोळ वादातून हल्ला

सुरक्षा रक्षकाची चाकूने हत्या; किरकोळ वादातून हल्ला

वांद्रे मधील घटना

Google News Follow

Related

बांद्रा पूर्वेतील खेरवाडी परिसरात सोमवारी दुपारी एका सुरक्षा रक्षकाची अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मृत सुरक्षा रक्षकाचे नाव अभिनव चौधरी (वय ५६) असून ते बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी होते. ते एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते ड्युटीवर असताना ही घटना घडली.

हे ही वाचा:

मुंबई हादरली! ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या साम्राज्यावर ईडीचा हातोडा

झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक

पुरुष पोलिस कॉन्स्टेबलला धर्मांतरित केले, निकाह करायला भाग पाडले!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौधरी यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांच्या मानेवर व हातांवर गंभीर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोबाईल कॉलला प्रतिसाद न दिल्याच्या कारणावरून आरोपीने चौधरी यांच्याशी वाद घालत हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना खेरवाडीतील म्हाडा कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा